अल फलाह उर्दू शाळेत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर उत्साहात.....
अल फलाह उर्दू शाळेत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर उत्साहात....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या सत्पाहभरापासून वर्षाकडे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे याकरिता आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मोफत वाटप करण्यात येत आहे शुक्रवार व शनिवार अल फलाह उर्दू प्राथमिक शाळा खडकपूरा येथे सदर शिबिर उत्साहात पार पडले.
आतापर्यंत संपूर्ण शहरात अकराशे नागरिकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने काढून देण्यात आले यामध्ये खडकपूरा येथील 200 नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला नगरसेविक लायका खान सरफराज खान व उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.शाहीद इक्बाल खान सर्फराज खान यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये आरोग्य कर्मचारी डॉ .विनोद चव्हाण , डॉ .सागर गोठेकर, आरोग्य सेवक राम बायस्कर , डॉ. मनोज बागुल, डॉ. गजानन देवकते, आरोग्य सेविका आठवले यांनी योगदान दिले यावेळी मोहम्मद अय्यन ,नासिरूद्दीन, वकार खान, शेख मकसुद व मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती होती .
तांत्रीक अडचणीचा खोडा
शहरात आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध प्रतिसाद मिळत असला तरी तांत्रिक अडचणीत खोडा निर्माण होत आहे यामध्ये साईट स्लो चालणे , ओटीपी ला वेळ लागणे , थंब्म मॅच , न होणे तसेच प्रत्येक लाभार्थ्याला दहा ते पंधरा मिनिट वेळ लागत असल्याने नागरिकांना तासांचा ताटकळत राहावे लागत आहे.
Comments
Post a Comment