प्रजासत्ताक दिना निमित जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी..

प्रजासत्ताक दिना निमित जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी..

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज शुक्रवारी जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान येथे विविध उपकर्माचे आयोजन करण्यात आले होते प्रथमता शाळाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक शफिक अहमद खान राही यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शासनाचे निर्देशाप्रमाणे विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी मा केंद्रप्रमुख शाहिद इकबाल खान सरफराज खान यांची उपस्थिती होती यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र महान यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शाळेत करण्यात आले होते यावेळी महान प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी डॉ किरण महादेवराव साबे डॉ प्रियंका बोचरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र महान यांनी वर्ग एक ते आठ मधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे मोफत उपचार बाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छताचे मूलमंत्र देऊन हात धुण्याची विविध पद्धती बाबत माहिती दिली यावेळी औषध निर्माण अधिकारी अब्दुल कद्दूस यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोग तंबाखू मुक्ती मोबाईलचे दुष्परिणाम इत्यादी बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच तंबाखूचे दुष्परिणाम बाबत सविस्तर माहिती दिली यावेळी कार्यक्रमाची प्रस्ताविक विज्ञान अध्यापिका शगुफ्ता जमाल शेख मोबीन यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विषय शिक्षक शेख मोबीन, अब्दुल सत्तार , नदीम खान , तसलीम खान, रुबीना परवीन , गुले ए राणा, रिजवान अहमद, इकराम खान, मोहम्मद सज्जाद , सैफोद्दीन मोइनोददिन , मुजीब बेग, सैयद असरार , आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाहिद इकबाल यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे