बार्शिटाकळी येथील सिंगल फेज वीज सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्या...
बार्शिटाकळी येथील सिंगल फेज वीज सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्या...
बार्शिटाकळी ता प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शीटाकळी : गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेली सिंगल फेज वीज सुरू करण्याची मागणी स्थानिक वीज विभागाच्या सहाय्यक अभियंता यांच्याकडे बार्शिटाकळीची सिंगल फेज वीज सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मो. रिजवान उर्फ बाबा मो . रफिक व प्रकाश खाडे यांनी मंगळवार 30 जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्याला प्रथम समस्या येत असल्याचे दिलेल्या निवेदनात कुठे म्हटले आहे अशा परिस्थितीत शेतात पेरलेल्या हरभरा, गहू, रब्बी पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होत आहे. अशा स्थितीत पिके वाचवण्यासाठी विनाकारण बंद झालेली सिंगल फेज वीज त्वरित पूर्ववत सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment