इंदिरा नगर येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर संपन्न....
इंदिरा नगर येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर संपन्न....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : येथील वार्ड क्र. १६ इंदिरा नगर येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे शिबिर घेण्यात आले. शिबिर घेण्यासाठी परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.या शिबिरात एकूण २०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड काढून दिली जात आहे त्या अंतर्गत शनिवारी दिनांक २७ जानेवारी रोजी इंदिरा नगर येथे सदर शिबिराचे आयोजन माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ईमरान खान इरफान खान यांनी केले होते. परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सदर आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घेण्याचे आवाहन व आयोजन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तथा माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान इरफान खान यांनी केले, सदर शिबिरामध्ये आरोग्य कर्मचारी डॉ शेळके सर, राम बायस्कर, डॉ विनोद चव्हाण,डॉ. सागर घोटेकर, डॉ.मनोज बागुल, डॉ गजानन देवकाते,डॉ.प्रशांत म्हस्के, ईमरान खान ईरफान खान माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य , सैय्यद सलीम, शेख अल्ताफ, फारूख शेख , अब्दुल कलाम अब्दुल इसराइल, व इंदिरा नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Great work
ReplyDelete