उजळेश्वरला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांचा उद्या अमृत महोत्सव सोहळा...
उजळेश्वरला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांचा उद्या अमृत महोत्सव सोहळा...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष बाबाराव बळीराम नानोटे यांचा अमृत महोत्सव सोहळा २ मार्चला उजळेश्वरला आयोजित केला आहे. यावेळी काँग्रेसच्या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडणार आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील उजळेश्वरला २ मार्चला सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष बाबाराव बळीराम नानोटे यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार चंद्रकांत हांडोरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम होत आहे. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुनील धाबेकर, अकोला जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर, वाशिम जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. अमित झनक, अमरावती मतदारसंघाचे आ. धीरज लिंगाडे, काँग्रेस कमिटीचे महासचिव शाम उमाळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अकोला व वाशिमचे अध्यक्ष संतोषदादा कोरपे, माजी मंत्री अजहर हुसेन, धनंजय देशमुख, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबाराव विखे, राज्य सचिव प्रकाश तायडे, माजी आ. सुरेश कानोत, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष महेश गणगणे, जिल्हा परिषद अकोलाचे माजी सभापती लक्ष्मीकांत महाकाल, जिल्हा सरचिटणीस राजेश पाटील लुले, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भूषण गायकवाड, बार्शिटाकळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बेटकर, मराठी पत्रकार संघ मुंबईचे माजी अध्यक्ष माधवराव अंभोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार चंद्रकांत हंडोरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले व. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
Comments
Post a Comment