कापशीच्या परिक्षा केंद्र संचालकांची मनमानी; विद्यार्थ्यीनीस परिक्षेपासुन वंचित ठेवले..

कापशीच्या परिक्षा केंद्र संचालकांची मनमानी; विद्यार्थ्यीनीस परिक्षेपासुन वंचित ठेवले

अनेक परीक्षार्थींना पाठवलं वापस

अकोला प्रतिनिधी 
अकोला तालुक्यातील : कापशी रोड येथील ऑनलाईन परीक्षा सेंटर असलेले श्री इन्फोटेक येथे आज सकाळी अंगणवाडी सेविका भरतीची आँनलाईन परिक्षा होती परीक्षा देण्यासाठी अकोला येथील उन्नती राहुल जायभाये व माहेर कडील नाव उन्नति उत्तम गंगावणे दोन्ही या दोन्ही नावाचे पुरावे असताना सुद्धा ऑनलाइन सेंटर वाल्यांनी त्यांना एकाच नावाचा पुरावा मागितला तर त्यांनी ताबडतोब पार्किंग मध्ये लावलेल्या गाडीमधून पुरावा आणण्यासाठी गेले असता त्यांना पुन्हा परीक्षेला बसू दिले नाही अशाच प्रकारे अमरावती,  यवतमाळ जिल्ह्यातील अनेक परीक्षा देणाऱ्यांना वापस केले परिक्षा पासुन वंचीत ठेवलेल्यांनी याची रीतसर तक्रार पातुर पोलीस स्टेशन कडे देण्यासाठी गेल्या असता पातुर पोलीस स्टेशन ठाणेदार किशोर शेळके यांनी त्यांचे तक्रार घेण्यास नकार दिला तरी अनेक वेळा अशा प्रकारे अनेक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी अनेक परीक्षेपासून वंचित राहिले आहे याकडे शासनाचे बिलकुलच लक्ष नाही असे दिसून येते त्यामुळे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याकडे लक्ष देऊन ज्यांना आज परीक्षा देण्यापासुन वंचीत ठेवले आहे त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे .

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....