दगडपारवा जवळील अरुंद पूल रुंद करा ! 👉तीव्र आंदोलन करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा...
दगडपारवा जवळील अरुंद पूल रुंद करा !
👉तीव्र आंदोलन करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : राष्ट्रीय महामार्ग अकोला ते डिग्रस या महामार्गावर दगडपारवा ते तिवसा या दोन्ही गावांच्या मधात असलेला बारा फुटाचा अरुंद पुल असल्यामुळे आजपर्यंत २५ अपघात झालेले आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गातील अधिकारी यांना अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचे पुलावर कठडे किंवा वांहन धारकरांना अरुंद पूल असल्याबाबत माहिती मिळत नसल्यामुळे सतत वाहन भारधाववेगात येतात व पुलावरून अपघात होत याची मालिका सतत सुरू आहे. तरी या पुलावर लवकरात लवकर कठडे बसवण्यात यावे याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी
तालुका यांच्या वतीने २९/०२/२०२४ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय, बार्शिटाकळी येथे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन असे कि, बार्शिटाकळी ते मंगरुळपीर रोड २२ ते २५ फुट रुंदीचा असून, यामध्ये दगडपारवा आणि तिवसा या गावाच्या मध्ये एक नाला आहे त्या नाल्यावरील पूल अत्यंत लहान म्हणजे अगदी १० ते १२ फुट रुंदीचा पूल आहे. अकोला ते मंगरूळपीर ये, जा करणारे वाहन भरधाव वेगाने चालतात. रोडवर एखादा फुल रोड पेक्षा कमी रुंदीचा असेल असं लक्षात येतच नाही. म्हणून आजपर्यंत १५ ते २२ एवढे अपघात झालेले आहे. या अगोदर सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेब बार्शिटाकळी यांना एक निवेदन देण्यात आले होते. कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नाही म्हणून २७/०२/२०२४ रोजी एकाच दिवसात दोन अपघात झाले आहे. म्हणून पुलाची शहानिशा करून वेळेत मोठा व रुंद पूल करून देण्यात यावा. आणि यापुढे सुद्धा त्या पुलावर अपघात होणार नाही, किव्हा जीवित हानी होणार नाही याकरिता निवेदन सादर करण्यात आले.
गोरसिंग राठोड तालुका कार्याध्यक्ष , शेख नईमोद्दीन, मिलिंद करवते, गोपाल चव्हाण, गोबा सेठ, राजेश खंडारे, शुद्धोधन इंगळे मखाराम राठोड, निलेश इंगळे, किरण पवार, संतोष इंगळे, सुधीर डोंगरे, सै रियासत, विजय चव्हाण, चेतन इंगळे, संतोष गवई, गजानन सुरजुसे, विशाल वानखडे, अरुण चव्हाण, मो. अफरोज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment