विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस,प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बार्शीटाकळी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस,प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 

बार्शिटाकळी: तालुक्यात सर्वदूर मेघगर्जना व वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि वादळी पावसाने यंदाच्याही रब्बी हंगामातील पिके उध्वस्त केली. आज सायंकाळी व रात्री अचानक वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाल्यानं रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि इतर पिक आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला असे म्हटले तर वावगे ठरु नये. बार्शीटाकळी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह प्रचंड प्रमाणात गारपीट झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे.

सध्या गहू, ज्वारी आणि हरभरा ही मुख्य रब्बी पिके परिपक्व झाली आहेत, तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहेत, त्याचवेळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. मागच्या वर्षी अशाच पद्धतीने काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालं होतं. आता यंदाही आणखी काही दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे.  

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती शासनाला सादर केली 
बार्शिटाकळी तहसीलच्या प्राथमिक स्वरूपाच्या शासकीय माहितीनुसार ७२२३ हे. आर पिकांचे व ४२६.४० हे.आर फळबागा व ७५१.६० हे. आर भाजीपाला वग्रीय पिकांचे असे ८००१.४० हेक्टर नुकसान झाल्याची माहिती शासनाला सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुनोती खु ,दगडपारवा झोडगा , वाघा (गड )कासमार ,महान ,हातोला ,वस्तापुर ,खोपडी

अत्यंत महत्त्वाचे
सर्व शेतकरी बांधवानी पीक विमा कंपनी व नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात , दि. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या बिगर मौसमी पाऊस वादळी वारा व गारपीट मुळे पीक नुकसान झाले असल्यास ,खालील पद्धतीने पीक विमा योजनेअंतर्गत पूर्वसूचना नोंद करावी.
गहू ,हरभरा,रब्बी कांदा
नुकसान कारण :-
बेमोसमी पाऊस, गारपीट ( यापैकी ज्या कारणामुळे पीक नुकसान झालेले आहे तेच कारण नमूद करावे)
गहू,रब्बी कांदा पिकास (उभे पीक) असे नमूद करणे.
हरभरा – काढणी पश्चात नुकसान असे नमूद करणे .
या पद्धतीने उपरोक्त पिकाचे नुकसान टक्केवारी व इतर आवश्यक माहिती परिपूर्ण सादर करून पूर्वसूचना देन्यात यावी.
पूर्वसूचना नुकसान घटना घडल्यापासून ७२ तासांचे आत देने आवश्यक असते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे