कारला येथे शंभर वर्षाची परंपरा राखत भवानीचा उत्सव उत्साहात संपन्न...
कारला येथे शंभर वर्षाची परंपरा राखत भवानीचा उत्सव उत्साहात संपन्न
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पातूर तालुक्यातील कारला गावात शंभर वर्षाची परंपरा कायम ठेवून होळीच्या पर्वावर भवानीचा उत्सव यावर्षी संपन्न होत आहे आणि होळीच्या दिवशी ठीक सात वाजता राम-लक्ष्मण यांची मिरवणूक गावातून फिरवल्या जाते आणि त्यानुसार संपूर्ण गावातून त्याची पूजा वगैरे केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भवानी प्रत्येक घरासमोर जाऊन त्या ठिकाणी पूजा केल्या जाते आणि हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून कारला गावामध्ये होते.व्यसनमुक्त , शांततेत मोठ्या उत्साहाने गावातून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा केला जातो.सनई, डफडे वाजवून तल सुरत मिरवणूक काढली जाते .गावातील नागरिकसुद्धा याला प्रतिसाद देतात. अतिशय चांगल्या वातावरणात शांततेच्या वातावरणात कारलामध्ये हा उत्सव संपन्न झाला आहे....
Comments
Post a Comment