द ग्रेट मराठा मित्र मंडळांने आयोजित केला होता सार्वजनिक होळी महोत्सव

द ग्रेट मराठा मित्र मंडळांने आयोजित केला होता सार्वजनिक होळी महोत्सव
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : स्थानिक द ग्रेट मराठा मित्र मंडळ या संघटने मार्फत दिनांक 25 -3 -2024 रोजी मराठी शाळेत समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रंग उत्सव कार्यक्रमाचे आयोजन द ग्रेट मराठा मित्र मंडळ कडून आयोजित करण्यात आला होता 
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत बोबडे, उपाध्यक्ष महादेवराव धाईत ,सचिव रमेश वाटमारे ,पुष्पा रत्नपारखी ,मनीषा बोबडे , धनंजय कवळकर संकेत सपकाळ,शुभम मस्के, संजय जैन, राहुल बोडखे, वीरू ठाकूर, सचिन आगाशे, दीपक कळसाई ,दिनेश  कवळकर, छोटू आखाडे, सचिन वराडे, उमेश अंधारे, आदि प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच यावेळी गावातील महिला व तरुण व समस्त द ग्रेट मराठा मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते या ठिकाणी नैसर्गिक रंगाची धुलीवंदन करून व कुठल्याही प्रकारचे व्यसनमुक्त कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन द ग्रेट मराठा मित्र मंडळ यांच्यातर्फे यावेळी शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते तसेच बार्शिटाकळी शहरांमध्ये अशा प्रकारची नशा मुक्त धुलीवंदन प्रथमच बार्शिटाकळी शहरात द ग्रेट मराठा मित्र मंडळा तर्फे आयोजित करण्यात आली होती 
या ठिकाणी व शहरात पोलीस चौक बंदोबस्त ठेवला या कार्याचे सर्वत्र महिला मंडळ तसेच पुरुष पुरुष मंडळी यांच्याकडून कार्यक्रमाची स्तुती करण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे