पोलिसांसमक्ष दोन गटात 'फ्री स्टाइल' !
पोलिसांसमक्ष दोन गटात 'फ्री स्टाइल'!
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी पोलिसांच्या समोर दोन गटात एकमेकाला शिवीगाळ करून काठीने मारहाण करणे तसेच लोंबाझोंबी अर्थात फ्री स्टाइल केल्याची घटना बार्शीटाकळीत शुक्रवारी घडली आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात पोलिसांचा वचक संपल्यामुळेच अशा घटना घडत असल्याची चर्चा होत होती.
बार्शिटाकळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ मार्चला सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास अनिल भगवान चव्हाण सराळा यांनी पोलिसांना माहिती दिली, की काही व्यक्ती बार्शिटाकळी येथील सार्वजनिक बायपास चौकात भांडत आहेत. यावरून बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पोलिसां समक्ष सार्वजनिक ठिकाणी एकमेकाला शिवीगाळ करणे, थापडा बुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण करणे तसेच फ्रीस्टाइल झाली. ठाणेदार शिरीष खंडारे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. तालुक्यातील सराळा गावातील एका गटातील व्यक्ती प्रकाश व सतीश भगवान चव्हाण यांचे घराचे बांधकाम चालू असल्याने
त्यांनी सार्वजनिक वाचनालयात सामान ठेवले होते तर दुसऱ्या गटातील व्यक्तींनी सदर वाचनालयात भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी अपनंबर १९१/२४ नुसार भादंवि कलम १६० नुसार आरोपी सुधाकर एकनाथ मस्के, संजय सुधाकर मस्के आनंदनगर हिंगणा अकोला व संदीप सुधाकर मरके निमवाडी पोलीस लाइन अकोला या एका गटातील व प्रकाश भगवान चव्हाण, सतीश भगवान चव्हाण सराळा व सचिन बाळू पाईकराव, राहुल बाळू पाईकराव जेतवन नगर खदान अकोला या दुसऱ्या गटातील आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथे पुढील कारवाई करता पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Comments
Post a Comment