रूपालीताई तूपवने यांना "फ्लोरेन्स नाईंटीन गेल " जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित. तेल्हारा तालुक्याच्या आरोग्य विभागाला एक मानाचा तुरा,
रूपालीताई तूपवने यांना "फ्लोरेन्स नाईंटीन गेल" जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित.
तेल्हारा तालुक्याच्या आरोग्य विभागाला एक मानाचा तुरा,
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने अकोला जिल्हा परिषद मध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना पुरस्कार देण्यात येतो तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र अंतगंत येणाऱ्या उपकेंद्रामधील आरोग्य सेविका रूपाली ताई तुपवने यांना फ्लोरेन्स नाईंटीन गेल जिल्हा स्थरीय तृतीय पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम बि वैष्णव यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालय सभागृह देण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉक्टर बळीराम गाढवे उपस्थित। सन्मानपूर्वक देण्यात आला
तेल्हारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र तळेगाव बाजार तालुका तेल्हारा या ठिकाणी कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका रूपाली नामदेव तूपोने ह्या सतत नऊ ते दहा वर्षापासून अहोरात्र आरोग्य विभागात सेवा देत असतांना अतिशय धडाडीचे व प्रामाणिकपणे काम करत असतात आरोग्य सेविका या संवर्गात उल्लेखनीय सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम बी वैष्णवी यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्काराने रूपाली तूपोने यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे आणि हीच त्यांच्या कामाची खरी पावती मिळालेले आहे आणि मुख्यालयीन हजर राहूनच अहोरात्र 24 बाय सात सेवा देतात तसेच आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सुश्रुषा करणाऱ्या परिचारिका यांचे मार्फत रुग्णांना आरोग्य सेवा दिल्या जातात विशेषतः माता आरोग्य सेवा व बालकांना वयाच्या सोळा वर्षापर्यंत लसीकरण व अन्य आरोग्य सेवा पुरविल्या जातात त्यामध्ये प्रसूती, लसीकरण, सुश्रुषा ,उपचार ,यांचा समावेश आहे तसेच कोरोना काळातील कोरोना योद्धा म्हणून 24 तास अहोरात्र रुग्णांच्या घरोघरी जाऊन त्यांनी जीवाची परवा न करता कुटुंब वाऱ्यावर सोडून रुग्णांची अहोरात्र सेवा केली त्यांना पुरस्कार मिळाल्यात्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने अभिनंदन करण्यातत आले आहे.
Comments
Post a Comment