गुलाम नबी आझाद महाविद्यालयात जागतिक जल दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन....

गुलाम नबी आझाद महाविद्यालयात जागतिक जल दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन..

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : स्थानीक बार्शिटाकळी येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाब नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शिटाकळी जि. अकोला, राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत व भूगर्भशास्त्र विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने जागतिक जल दिवस 2024 साजरा करण्यात आला. या निमित्ताने पाण्याचे महत्त्व, संवर्धन व पाणी वाचविण्यासाठी भविष्यात करावयाचे नियोजन संबधित विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलन व पुजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ अमीत वैराळे तर प्रमुख मार्गदर्शक डॉ संजय देशमुख हे लाभले होते. सोबतच प्रा पाटील, प्रा सुरडकर हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा व्हि एस उंडाळ यांनी केले व प्रमुख मार्गदर्शक डॉ संजय देशमुख यांची ओळख करून दिली. पर्यावरणामधे अनेक बदलामुळे दिवसेंदिवस उन्हाळ्यात
तापमानात वाढ होतांना दिसून येते, याचाच परिणाम म्हणजे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने
कमी होत आहे. याच कारणामुळे भविष्यात पाण्याची भिषण टंचाई निर्माण होऊ शकते आणि म्हणुन वेळीच सावध होऊन पाणी सांभाळुन वापरण्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन डॉ देशमुख यांनी केले. प्रत्येकांनी आपल्या सभोवतालच्या परिसरात पाणी वाया जाऊ नये याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी पुढे अनेक उपस्थित मान्यवरांनी आपले विचार प्रस्तुत करतांना पाण्याचे महत्त्व, पाण्याचा योग्य तो वापर करने, पाणी वाया जाऊ न देणे इत्यादी आवश्यक विषयावर चर्चा केली. पुढे मान्यवरांचे विचार ऐकल्या नंतर सर्वानी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा निर्धार घेऊन त्या संबंधित सामुहिक शपथ घेतली. सामुहिक शपथ घेतल्यानंतर आभार प्रदर्शनांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी सर्व विज्ञान शाखांचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रासेयो चे प्रमुख डॉ उंडाळ, डॉ ईढोळे, डॉ वाघमारे, डॉ कंकाळे, डॉ कुटे, डॉ अहीर, डॉ जैन, डॉ काळे, डॉ मसतकर इत्यादी व उपस्थित विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे