शासनाने संच मान्यता संदर्भात काढलेला अद्यादेश त्वरीत रद्द करावा अन्यथा आंदोलनाचा राज्यउपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांचा इशारा
शासनाने संच मान्यता संदर्भात काढलेला अद्यादेश त्वरीत रद्द करावा अन्यथा आंदोलनाचा राज्यउपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांचा इशारा
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
अकोला दि. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच १५ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमीत केला यामुळे महाराष्ट्रातील माध्यमिक शाळा मुख्याद्यापक पद धोक्यात आले असुन हा अद्यादेश त्वरीत रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्यात येइल असे उद्गार अखिल महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याद्यापक संघाचे राज्य मुख्याद्यापक संघ उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकताच अद्यादेश काढून ५ ते ८ वी.च्या माध्यमिक शाळा मधील विद्यार्थी संख्या १०० ऐवजी १३५ केल्यामुळे छोटया छोटया शाळांचे मुख्याद्यापकाचे पद धोक्यात आले असुन हा अद्यादेश त्वरीत रदृद करावा अशा आशयाचे निवेदन अखिल महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक संघाचे संस्थापक रावसाहेब आवारी यांच्या नेतृत्वाखाली राज्यअध्यक्ष केरभाउ ढोमसे यांच्या मार्गदर्शनात शासनाकडे अद्यादेश रद्द करणे बाबत मागणी करण्यात आली असुन हया संदर्भात लवकरच राज्य संघटनेच्या पदाधिकारी यांची देखील बैठक बोलाविण्यात आली असल्याचे उपाध्यक्ष यांनी सांगीतले आहे.
अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, आयुक्त व संचालक यांना संघटनेच्या माध्यमातुन देण्यात आले असुन हा अद्यादेश लवकरात लवकर रद्द करावा असेही त्यांनी सांगीतले आहे. हया अद्यादेशा नुसार केवळ मुख्याद्यापकच नव्हेतर तर माध्यमिक शाळा शिक्षकांकरीता दुस-या तुकडी साठी देखील विद्यार्थी संख्या वाढविण्यात आली आहे. पुर्वी १०० विद्यार्थ्यावर एक मुख्याद्यापक होता परंतु आजरोजी संघटनेने शाळा तेथे मुख्याद्यापक असावा हया दृष्टीने शासनाने हा अद्यादेश सुधारणा करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असेही या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment