भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हयाचे वतीने भव्य सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन..
भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हयाचे वतीने भव्य सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन..
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
अकोला: दि. २९ दि. बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापण केलेल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर हे बौध्दाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभर कार्य करीत असून बौध्द बांधवाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करित आहेत. त्याचसाठी सन २०२३ पासून भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा कार्यकारणीच्या पुढाकारांने आणि सामाजीक संघटनांच्या सहकायर्याने अकोला शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन केले जात आहे.यावर्षी सुब्दा १४ एप्रिल २०२४ रोजी भव्य प्रमाणात भिमजयंती साजरी केली जाणार असून ग्रामीण भागातील आणि शहरातील वार्डा-वार्डामधून भिम अनुयायांनी आणि सामाजीक संघटनांनी आपआपले ट्रक्टर, लेझीम आखाड्यासह मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. राजरत्न आंबेडकर प्रणीत भारतीय बौध्द महासभेचमहासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण, कार्याध्यक्ष देवीलाल तायडे व जिल्हा कार्यकारणीने पत्रकार भवन निमवाडी, अकोला येथे आयोजीत पत्रकार परिषदेत केले आहे.
डॉ. राजरत्न आंबेडकर प्रणीत भारतीय बौध्द महासभेच्या वतीने बौध्द धम्मीयांची स्वतंत्र बैंक,
शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये, बौध्द युनिव्हर्सिटी, हॉस्पीटल निर्माण करणे, त्याच पध्दतीने बौध्द धम्मीयांचे स्वतंत्र अस्तीत्व दिसावे यासाठी सार्वजनिक भिमजयंतीचे आयोजन केले जात आहे. मागील वर्षी ग्रामीण भागातून आणि शहरामधून मोठ्या प्रमाणात लेझीम आखाडे, बॅन्ड पथक, वेगवेगळी देखावे सादर केलेले रथ, तसेच बुध्द भिम गीत गायन करणाऱ्या कलाकारांनी भिम जयंतीची शोभा वाढविली होती त्या पध्दतीने यावर्षी सुध्दा भिमजयंतीची मिरवणुक १४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता रेल्वे स्टेशन रोड वरील अग्रसेन चौकापासून सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक संतोषी माता चौक, अकोट स्टॅण्ड मार्गे तिलक रोडवरुन सिटी कोतवाली चौक, गांधी चौक, नविन बस स्टॅन्ड चौक मार्गे अशोक वाटीका येथे या मिरवणुकीचा समारोह होणार आहे. तरी ग्रामीण भागातील व शहरातील सामाजीक संघटना, बौध्द उपासक, उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चकनारायण, कार्याध्यक्ष देविलाल तायडे, लॉर्ड बुध्दा फाऊंडेशन वंदना संघाचे अध्यक्ष इरभानजी तायडे, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य महासचिव तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे, बहुजन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एम. एम. तायडे, समाज क्रांती आघाडीचे राज्य उपाध्यदक्ष बंडुदादा वानखडे, कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय इंगळे आदीनी केले आहे. या पत्रकार परिषदेला भारतीय बौध्द महासभेचे महानगर अध्यक्ष सुनिल सिस्साट, महिला जिल्हाध्यक्षा राजकन्या सावळे, महानगर महिला अध्यक्षा शोभा वानखडे, ॲड, चंद्रशेखर वंदी, यशवंत इंगोले, बाळासाहेब अंभोरे, सुनिल तायडे, राजु मोरे, दयाराम तायडे, उत्तमराव सदर्दाशिव, जिलेट अहीर, आनंद पळसपगार, ॲड. रोशन तायडे, एम.ओ. घुगे सतिश तेलगोटे सामाजिक कार्यकर्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment