बार्शिटाकळी शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनेत वाढ मुख्याध्यापक शफीक अहमद खान यांची दुचाकी घरा समोरून अज्ञात चोरट्याने केली लंपास
बार्शिटाकळी शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनेत वाढ
मुख्याध्यापक शफीक अहमद खान यांची दुचाकी घरा समोरून अज्ञात चोरट्याने केली लंपास
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : शहरात सध्या अज्ञात चोरटे घरासमोर उभे असलेल्या दुचाकी वहाना वर आपले हाथ साफ करित आहे शहरातील मुख्य बाजार लाईन मधील महान केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शफिक अहमद खान मेहबूब खान यांच्या घरा समोर रात्रि त्यांचा मुलगा सज्जाद अहमद यानी आपली युनिकॉन MH 30 AM 1875 क्रमानकाची दुचाकी वाहन उभे केले होते रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी सदर बाईकवर आपले हात साफ केले याबाबत त्यांनी बार्शिटाकळी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दिली अस्ता बार्शिटाकळी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला चोरी झालेल्या मोटर सायकल ची किम्मत 40 हजार रुपये दाखविन्यात आली आहे, शहरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य असते सदर चोरटे अंधाराचा फायदा घेऊन आपले हाथ साफ करित आहे नुकताच इंद्रानगर येथील सुध्दा एका दुचाकी वाहनांवर चोरट्यांनी आपले हात साफ केले आहे हे विशेष
Comments
Post a Comment