पावसाळ्यात काय होणारः नागरिकांना चिंता बार्शिटाकळी आमदारांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर असलेली अनेक कामे अर्धवट
पावसाळ्यात काय होणारः नागरिकांना चिंता
बार्शिटाकळी आमदारांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर असलेली अनेक कामे अर्धवट
बार्शिटाकळी, दि. २० । आमदार पिंपळे यांचे विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या अनेक रस्त्याचे डांबरीकरण कामे अर्धवट असल्यामुळे या पायातील लोकांना येजा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो, समोर पावसाळा तोंडावर आल्यामुळे नागरिकांना सुविधेची चिंता सतावत आहे.
बार्शिटाकळी ते पाटखेड, तसेच चिचोली रुद्रयनी माता मंदिर या रस्त्याचे काम अनेक दिवसापासून काम बंद आहे. आणि चिखलगाव वाघजाळी, चिंचोली रूद्रायणी, राजनखेड, धाबा,महागाव , बार्शिटाकळी पिपळखुटा, रस्त्याचे कामे सुद्धा अर्धवट आहेत, ही कामे अर्धवट सोडून ठेकेदार गायब झाले आहेत अधिकारी सुद्धा पाकडे फिरकून पाहत नाहीत या रस्त्याचे अर्धवट काम असल्यामुळे येणान्या जाणान्यांना पाचा मोठा त्रास सहन करावा लागतो एकदा कदाचित रुग्ण ताबडतोब अकोला न्यायचा असेल तर मोठा प्रश्न पडतो, ही बहुतांश रस्त्याची कामे आमदार हरिशभाऊ पिंपळे यांच्या विशेष प्रयत्नानातून मंजूर झालेले ही कामे आहेत, यासर्व रस्त्याची देखरेख करणे आणि डांबरीकरणाची कामे सुरळीतपणे पूर्ण करून घेण्याची खरी जबाबदारी मुख्यमंत्री ग्राम सडक
योजनेची आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे
अधिकारी या अर्थवट कामाकडे पाहत नाहीत त्यामुळे लोकांना वेगान्या पावसाळ्याची चिंता वाटू लागली आहे ही अर्थवट कामे पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण झाली नाही तर लोकांना याचा मोठा त्रास होईल, अनेक समस्या निर्माण होतील, ही बंद असलेली कामे
सुरू करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी लक्ष का देत नाहीत,?
ही अर्धवट कामे पूर्ण का करून घेत नाहीत, या कामाबावत संबंधित कर्मचान्यांना जाब का विचारला जात नाही? असे अनेक प्रथ तालुक्यातील नागरिक करीत आहेत, रसस्थाच्या अर्धवट कामामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतो, ती अर्धवट कामे
वेगाने होण्यासाठी लोकप्रतिनिधी पाचा पाठपुरावा का करीत नाही? असा प्रन सुद्धा नागरिक करीत आहे, अधिकारी सुद्धा आपली जबाबदारी व्यवस्थित पार पड़त क्सत्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी तातडीने लक्ष देऊन बार्शी टाकळी तालुक्यातील बंद पडलेले अर्धवट सत्याचे कामे तातडीने पूर्ण कराने,
महान पिंजर रस्त्यावरील पुलाचे काम आणि पिंजर महान मार्गावरील पुलाचे बांधकाम गेल्या एक वर्षापासून अपूर्ण आहे. याबाबत कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देऊन खुलासा करावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे.
प्रत्येक वेळी लोकाना आदोलन करूनच आपली कामे करून घ्यावी लागली, प्रभासलाला जाग येत नसल्याने आणि अधिकारी आपली जबाबदारी प्रामानिक पने बजावता नाहीत, बार्शिटाकळी तालुक्यातील
आमदार कोट्यातील अनेक रस्ते अर्धवट आहेत, यामुळे लोकांना त्रास होत आहे, आता आआंदोलन करूनच ही रसाचे कामे पूर्व करणार का अधिका-यांनी स्वतःची जबाबदारी समजून ही कामे पूर्ण करावी, लोक प्रतिनिधी शुद्ध पाठपुरावा करत नसल्याने तालुक्यातील अनेक करने अपेक्ट आणि काही ठिकाणी संथगतीने काने सुरू आहेत, समोर पावसाळा असल्याने लोकांना मोठी चिंता वाटू लागली आहे,
- रुद्राक्ष राठोड, सामाजिक कार्यकर्ता चिंचोली रुद्रयणी
बार्शिटाकळी ते पाटखेड रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे असून हे काम सध्या परिस्थितीमध्ये सुरु आहे.
आम्ही लवकर पूर्ण करणार आहोत, आणि चिंचोली रुद्रायणी येथील रस्स्याचे काम दुसऱ्या विभागाचे आहे.
प्रशांत ढवळे
शाखा अभियंता मुख्यमंत्री ग्राहक योजना अकोला
बार्शिटाकळी तालुक्यातील रस्त्याची कामे संत गतीने किंवा अर्धवट असतील तर, से ताबडतोब पूर्ण करण्यात येतील, सदर कामें का बंद आहेत याची माहिती मला नाही मी माहिती करून घेतो, आणि लोकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, त्याचप्रमाणे पिजर महान, आणि पिंजर बार्शिटाकळी मार्गावरील पुलाचे काम सुद्धा तातडीने पूर्ण करण्याचे आदेशित बनतो,
प्रसाद पाटील
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला
Comments
Post a Comment