खदानीत बुडालेल्या युवकास संत गाडगे बाबा आपात्कालीन पथकाच्या जवानांनी शोधून काढले. ∆मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जि.अकोला यांची धाडसी कारवाई

खदानीत बुडालेल्या युवकास संत गाडगे बाबा आपात्कालीन पथकाच्या जवानांनी शोधून काढले.

∆मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जि.अकोला यांची धाडसी कारवाई

बार्शिटाकळी : कुंभारी ते विझोरा रोडवरील बार्शीटाकळी पोलीस हद्दीतील कुंभारी नजिक असलेल्या खदान मधे अकोल्यातील डाबकी रोडवरील गजानन नगरमधील सोनु वानखडे वय अं.(20) वर्ष हा आपल्या 7 ते 8 मित्रांसह 29 मे रोजी दुपारी पोहण्यासाठी आला होता यावेळी तो बुडाला असल्याची माहीती  बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे साहेब यांना माहीती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेचच जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार, विष्णु केवट, अंकुश सदाफळे, ऋषिकेश राखोंडे, शेखर केवट, संकेत देशमुख, गोकुळ तायडे, संतोष वाघमारे, रोहन मुंढे, योगेश कुदळे, यांचेसह शोध व बचाव साहित्य, जनरेटर,लाईट सेटप, आणी  आपात्कालीन वाहणासह घटनास्थळी रात्री 9:00 वाजता पोहचले लगेच सिन ट्रेस केला खदान 25 / 30 फुट खोल पाणी आणी तळाशी मोठ मोठ्या टोकदार  दगड चिफा असल्याचे निष्पन्न झाले अशा परिस्थितीमध्ये अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन करण फारच अवघड असते रेस्क्युवरला ईजा होण्याची दाट शक्यता असते यामुळे अतिशय बारकाईने तळाशी शोध घ्यावा लागतो ही सर्व परीस्थीती लक्षात घेऊन ठाणेदार शिरीष खंडारे साहेब यांच्या आदेशाने लगेच सर्च ऑपरेशन चालु केले आणी अर्ध्या तासात पथकातील जवानांनी तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला.यावेळी बार्शीटाकळीचे एएसआय विजय इंगळे साहेब, आणी पोलीस कर्मचारी तसेच नातेवाईक हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे