पातुर तालुक्यात महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत

पातुर तालुक्यात महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत
प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : पातुर तालुक्यात महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला र. न. 3881 संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत करण्यासाठी नुकतेच 25 मे रोजी सभेचेे आयोजन वसंतराव नाईक विद्यालय पातुर येथे आयोजन करण्यात आले होते‌, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णु लाड हे होते. प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष संगीता जाधव ,जिल्हा सरचिटणीस संजय डाबेराव, कोषाध्यक्ष मंगला तितुर, कार्याध्यक्ष शुभांगी बारब्दे , जिल्हा संघटक क्षमा बायस्कार, जिल्हा सहसचिव वृंदा विजयकर, जिल्हा सहसचिव रवी राठोड. जिल्हा सल्लागार शेषराव राठोड, जिल्हा सदस्य छायाताई आगमे जिल्ह्यातील पदाधिकारी ,यावेळी उपस्थित होते, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पातुर तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यकारणी गठित करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्र बाबुळगाव येथील आरोग्य सहाय्यक सुनील मेसरे यांची पातुर तालुका अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली, तर सचिव पदी सुनील कराळे, यांचे निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष पदी विश्वनाथ कांबळे, कोषाध्यक्षपदी धम्मपाल खंडारे, उपाध्यक्ष पदी राजेश शिंदे , तालुका संघटक बावणे ताई, तालुका प्रसिद्धीप्रमुख आशा इंगळे ताई, तालुका मुख्य सल्लागार क्षमाताई बायस्कार, तालुका मुख्य सल्लागार श्रीमती खोडके ताई, तालुका संघटक ज्योती डाखोरे ताई , तालुका सहसचिव सुनंदा कासार ,तालुका सहसचिव हर्षवती चव्हाण यांची अविरोध निवड करण्यात आली तसेच कार्यकारणी सदस्य महादेव तायडे, गोपाल राऊत, शुभम बदरके, गजानन डाखोरे ,शेषराव राठोड यांची यावेळी सदस्य म्हणून निवड करण्यात आली, 
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाढत्या डाटा एन्ट्री चा भस्मासुर प्रशासनाकडून देण्यात येणारे उशिरा पगार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ , टीम बेस ईन्सेंटिव्ह ,श्रेणी विषयक समस्या अशा अनेक वेगवेगळ्या हक्का अधिकार विषयावर वेगवेगळ्या चर्चा घडवून आल्या, कार्यक्रमाचे संचालन रवि राठोड यांनी केले तर
 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील मेसरे यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....