साहेब आमच्या भागातील अंधार दूर करा हो "शंभूसेनेची" महावितरणला निवेदनाद्वारे आर्त हाक

साहेब आमच्या भागातील अंधार दूर करा हो "शंभूसेनेची" महावितरणला निवेदनाद्वारे आर्त हाक
बार्शिटाकळी, दि. २१ (प्रतिनिधी श्रावण भातखडे) शहरातील अविकसीत असलेला भाग म्हणजेच वार्ड नं.२ नगर पंचायत स्थापन झाल्यापासून हा परिसर ग्रीन झोन मध्ये होता. त्यामुळे येथील विकास खुंटल्यातच जमा आहे. परिणामी येथे झाडेझुडपे प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे या भागात सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. परिणामी निरापराध नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. म्हणून ह्या भागातील नागरिकांनी निवेदन सादर करुन विद्युत पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले विद्युत खांब उभारून विजेची सोय करावी. अशी मागणी शंभू सेनेच्या वतीने एका निवेदनातून महावितरणाला  केली आहे.
या भागात वीजपुरवठा नसल्यामुळे सर्वत्रच अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  शंभुसेनेच्या सचिन आगाशे यांच्या नेतृव्वात बार्शिटाकळी येथील वीजवितरण कंपनीला निवेदन देण्यात आले. यावेळी बंडूमामा भगत, संतोष पंडित, पुरुषोत्तम बिडवे, अमोल उजाळे, राजू वाघमारे, अंकुश कुरसुंगे, दीपक कळसाईत, सौरभ अग्रवाल , दीलीप राजुरकर, आनंद आगाशे, बबलू चावके, ज्ञानेश्वर वाघमारे , दिनेश अग्रवाल, दादू हिवराळे, निलेश कडुकार, शुभम राजूरकर, उमेश अग्रवाल, सुनील भगत, प्रतीक धाईत, संजू सुर्यतळ, विजय शेजव, सोनु मनवर, ज्ञानेश्वर खाडे, गोविंदा आखाडे अतुल खिरेकार व गणेश वाघमारे, गणेश मोताळकर, अमोल वाट, यांच्यासह या भागातील नागरिक बहुतांश नागरिक उपस्थित होते.

या ठिकाणी खांबाची आवश्यकता

बोबडे मॅडम ते गणेश मोताळकर यांच्या घरा दरम्यान. रामराव नेवारे ते अमृतलाल ठाकूर यांच्या घरा दरम्यान, श्याम खंडारे ते पार्वताबाई बाबाराव चव्हाण यांच्या घरादरम्यान. पारबताबाई चव्हाण ते किशोर खाडे यांच्या घरादरम्यान. किशोर खाडे ते सागर बेहनवाल यांच्या घरादरम्यान. राठोड साहेब ते श्याम खंडारे यांच्या घरा दरम्यान. सागर बेहनवाल ते अमोल वाट यांच्या घरा दरम्यान.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे