बार्शिटाकळी येथे शासकीय "ज्वारी "काटा पूजनाने खरेदीची सुरुवात
बार्शिटाकळी येथे शासकीय "ज्वारी "काटा पूजनाने खरेदीची सुरुवात
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : शासनाच्या आधारभूत किमती अंतर्गत दिनांक 22 मे 2024 रोजी शासकीय गोडाऊन तहसील कार्यालय परिसर बार्शीटाकळी येथे तहसीलदार राजेश वझीरे यांचे हस्ते काटा पूजन करण्यात आले.
शासनाच्या आधारभूत किमती अंतर्गत रब्बी हंगाम 2023- 2024 या अंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने ज्वार मका खरेदीचा धोरणात्मक निर्णय घेऊन दी 8 मे 2024 पासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत पेरलेल्या ज्वारीच्या व मक्याच्या नोंदणीस प्रारंभ झाला. त्यानुसार शासनाने दिनांक 22 मे पासून जवाहर खरेदीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी वाघा येथील शेतकरी रमेश बेटकर यांना शेला नारळ देऊन त्यांचा सत्कार खरेदी-विक्रीचे अध्यक्ष गजानन पाटील घुमसे यांनी केला. यावेळी खरेदी-विक्रीचे संचालक गजाननराव आखरे, नवरत्न पाटील कावरे , सहदेवराव नानोटे, गोपाल भटकर , प्रमोद भांडवलकर , राजू पाटील महल्ले आदी उपस्थित होते.
यावेळी पूनोति येथील शेतकरी मंगेश सावरकर , संजय काळे चिंचखेड, उजरेश्वर चे बाळू पाटील आधी शेतकरी उपस्थित होते.
तसेच तालुका पुरवठा अधिकारी आनंद गुप्ताजी, गोदाम व्यवस्थापक जॉकी डोंगरे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश पाटील शेळके , खरेदी-विक्रीचे व्यवस्थापक संतोष म्हैसने, लिपिक विनोद बेटकर कर्मचारी गोपाल काळे संगणक चालक बाळकृष्ण उताणे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली जवारी खरेदी केंद्रावर आणण्याकरिता एसएमएस द्वारा सूचित करण्यात येईल त्यानंतरच सदर शेतकऱ्यांनी आपला माल केंद्रावर आणावा असे आवाहन खरेदी-विक्रीचे अध्यक्ष गजानन पाटील घुमसे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment