नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या हस्ते समाज मंदिराचे उदघाटन....

नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या हस्ते समाज मंदिराचे उदघाटन....
प्रतिनिधी श्रावण भातखडे 
अकोट : बुद्ध पौर्णिमा निमित्त आंबोडीवेस आकोट येथे समाज मंदिराचे उदघाटन आकोट शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोलजी माळवे यांच्या हस्ते करण्यात आले 
अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे दया शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंती निमित्त बोधिसत्व एकता मंडळ आंबोडीवेस येथे सम्राट अशोक ग्रुप तर्फे भोजन दानाचा कार्यक्रम व समाज मंदिराचे उदघाटनाचा कार्यक्रम आकोट शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोलजी माळवे साहेब यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आले या परिसरात सर्व धर्म समभाव असलेले आजूबाजीला सर्व जाती धर्माचे लोकं या परिसरात एकोबाने राहतात याचे कौतुक पोलीस निरीक्षक माळवे साहेब यांनी केले सोबत पोलीस उपनिरीक्षक रणजितजी खेडकर, कुलट मेजर हे सुद्धा उपस्थित होते प्रमुख उपस्थिती दिवाकरभाऊ गवई माजी उपाध्यक्ष नगर परिषद आकोट सुभाष तेलगोटे सदानंद तेलगोटे दिनेश घोडेस्वार विशाल तेलगोटे विशाल आग्रे लखन इंगळे विक्की तेलगोटे अक्षय तेलगोटे राजेश तेलगोटे नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे विक्की वी. तेलगोटे रोशन तेलगोटे आनंद तेलगोटे करण तेलगोटे मॉन्टी तेलगोटे आनंद भटकर विकास तेलगोटे करण तेलगोटे रोशन सोनोने अभिजित भटकर व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत बुद्ध जयंती वंदना घेऊन करण्यात आली सर्व युवा पोरांचे व महिला संघ हे चांगले कार्य करीत आहे असे म्हणुन पोलीस निरीक्षक माळवे साहेब यांनी कौतुक केले व जयंती शांततेने पार पडली

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे