म्हैसपुर येथील दिलीप वानखडे यांचे आमरण उपोषण पोलीस निरीक्षक यांच्या आश्वासनाने सोडले
म्हैसपुर येथील दिलीप वानखडे यांचे आमरण उपोषण पोलीस निरीक्षक यांच्या आश्वासनाने सोडले
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी दि २४ : बार्शिटाकळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेले म्हैसपुर येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य दिलीप वानखडे यांचे विविध मागण्यांसाठी २० मे रोजी १)ग्रामपंचायतचे कामामध्ये नेहमीच अडचण करणाऱ्या प्रशासनाला कुठेतरी लगाम लागावा २) ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडी जवळ अतिक्रमण करणाऱ्या व कारवाई करणे बाबत ३)अतिक्रमण हटविणे बाबत व नालीचे वाद बाबत वेळोवेळी पोलीस प्रशासनाला कागदपत्रे संपर्क करून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही ४) जनतेच्या समस्या सोडवण्याकरता जाणारे सरपंच उपसरपंच यांच्यावर गुन्हे दाखल केल्याबाबत आदी मागण्याबाबत आमरण उपोषणाला प्राथमिक उपकेंद्र म्हैसपुर येथे सुरू करण्यात आले होते अखेर २१ मे रोजी दुपारी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी कार्यवाहीचे आश्वासन देऊन आमरण उपोशन निंबुशरबत पाजून सोडविले यावेळी उपस्थित ग्राम पंचायत सरपंच सौ सरलाताई भास्कर गायगोले, उपसरपंच इंजि एस. एस. गायगोले, तंटामुक्त अध्यक्ष रामकृष्ण शेळके, बाळाभाऊ पाटेखेड़े, गुलाब इंगळे, अज़ाबराव खंडारे, पोलिस प्रशासन मधिल कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment