बाबासाहेब धाबेकर विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची प्रथा कायमच...
बाबासाहेब धाबेकर विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची प्रथा कायमच
(श्रावण भातखडे बार्शिटाकळी)
बार्शिटाकळी स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यालयाने नुकत्याच झालेल्या दहावी (एसएससी) बोर्डच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची प्रथा कायम ठेवली परीक्षेला उर्दू व मराठी माध्यमला बसलेल्या एकूण ३२८ विद्यार्थ्यांपैकी ३२३ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले परिणामी त्यांचा यशाचा दर्जा ९८. ४७ इतका आहे. उर्दू माध्यम मध्ये आयशा युसुरा सय्यद राजिक ९२.४० गुणांसह शाळेत अव्वल ठरली. लायबा सरोश मोहम्मद शारिक हीने ९१.८० गुणांसह द्वितीय क्रमांक व मोनिसा बुशरा अब्दुल सुबूर खान हिने ९०.००% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला तसेच मराठी माध्यम मध्ये हडाले साहिल कुंदनने ९०.२० % गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला तर राऊत पूजा विजय ८७.६०% गुणांसह द्वितीय व सोनवणे राजवर्धन गजानन ८७.००% गुणांसह तृतीय ठरले हे उल्लेखनीय निकाल बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे मुख्याध्यापक गजेंद्र श्रीराम काळे सर विद्यार्थी आणि कर्मचारी यांची मेहनत आणि समर्पण दर्शवतात शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी संस्थेची वचनबद्धता या उत्कृष्ट कामगिरी द्वारे चमकत आहे पुढील पण असेच निकालाची प्रथा कायम ठेवली जाईल..
Comments
Post a Comment