पत्रकारावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी…. मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पातुर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…

पातूर : तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा या गावांमध्ये राहुल देशमुख या पत्रकारावर प्राण घातक हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले आहे
या घटनेचा पातुर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला असून या निषेधाचे निवेदन पातुरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.

आज 30 मे 2024 रोजी सदर निवेदन देण्यात आले असून यामध्ये हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गतगुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच पातुर तालुक्यात अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात आहे आणि अवैध उत्खननाच्या माध्यमातूनच असे हल्ल्यांचे सत्र आहे त्यामुळे सदरचे अवैध उत्खनन बंद करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश सुरजूसे, पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले , ज्येष्ठ पत्रकार राजारामजी देवकर , श्रीधर लाड,सुदेश इंगळे, रमेश देवकर, एडवोकेट सुरेखा हिरळकर, शैलेश जगदाळे, मनोहर सोनोने, अविनाश पोहरे, छगन कराळे, गुलाबराव अंभोरे, सय्यद हसन बाबू, जुबेर शेख, डॉ. सुभाष हिरळकर, तोंकीर अहमद, बाबूलाल सुरवाडे, जनार्दन हिरळकार, यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे