ग्रामपंचायत सचिवाची खातेनिहाय चौकशीची विशाल आग्रे यांची मागणी...
ग्रामपंचायत सचिवाची खातेनिहाय चौकशीची विशाल आग्रे यांची मागणी...
प्रतिनिधी श्रावण भातखडे
अकोला... गट ग्रामपंचायत करतवाडीचे सचिव यांची खाते निहाय चौकशी करण्यात यावी. सम्राट युवाशक्ती संघटनेचे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन माहिती सविस्तर : अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार सर्कल मधील, गट ग्रामपंचायत करतवाडी येथील ग्राम ढगा संदर्भात,*आज 24 मे 2024 रोजी मा.जिल्हाधिकारी, अकोला व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांना गट ग्रामपंचायत करतवाडी अंतर्गत येत असलेल्या ढगा या गावची परिस्थिती ही अतिशय चिंताजनक असल्याचे निदर्शनास आली आहे.
ना गावांमध्ये सभागृह, ना रस्ते,ना नाल्या, सांडपाण्याची दयनीय अवस्था, अशी भरपूर कारणे गावाच्या विकासासाठी कारणीभूत ठरत आहेत.शासन या गावाकडे का दुर्लक्ष करीत आहे.
गावाचा विकास हा केवळ कागदावरच आहे का? गेल्या 15 वर्षांपासून ग्राम सचिव तळ ठोकून का बसले आहेत? हा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. ग्राम ढगा गावामध्ये कुठ - कुठली विकास कामे करण्यात आली. सर्व कामांची चौकशी करण्यात यावी. व ग्राम सचिव यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सम्राट युवाशक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विशाल सुभाषराव आग्रे यांनी दिला आहे
Comments
Post a Comment