सायखेड येथे बुद्ध जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम! पिंपळाच्या झाडाचा वाढदिवस साजरा...
सायखेड येथे बुद्ध जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम! पिंपळाच्या झाडाचा वाढदिवस साजरा
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील सायखेड येथे बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर पंचक्रोशीतील बौद्ध उपासक उपासिकांना निमंत्रित करून पिंपळाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचा आगळावेगळा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात शेकडो बौद्ध बांधवांना व ग्रामस्थांना भोजनदान देऊन बुद्ध जयंती निमित्त पिंपळाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे अनेक जण साक्षीदार झाले. शुभ्र वस्त्र परिधान करून बौद्ध उपासक व उपासिका पिंपळ वृक्षाखाली गोळा झाल्या. सामूहिक बुद्ध वंदना घेऊन शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची पुष्प दीप धुपाने पूजन केले . यंदा या बुद्ध जयंती उत्सवांमध्ये विदर्भ, मराठवाड्यातून बौद्ध बांधवांनी हजेरी लावली होती. यानिमित्ताने बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन सायखेड येथील श्रद्धावान बौद्ध उपासक सखाराम वाघुजी इंगळे, ताईबाई सखाराम इंगळे यांनी केले होते .यावेळी त्यांचे कुटुंबातील बाळू सखाराम इंगळे, मंगला इंगळे ,निळकंठ इंगळे, करुणा इंगळे, विश्वास इंगळे, वंदना इंगळे, सज्जन इंगळे, संविधान इंगळे, केदेश्वर इंगळे ,विजय इंगळे ,कु. मीना इंगळे ,प्रजावती इंगळे ,साक्षी इंगळे, खुशी इंगळे ,सम्राट इंगळे, सुरेंद्र हिवराळे, गोपाल धाडसे, गीता धाडसे, कपिल धाडसे, वर्धमान सावळे ,साधना सावळे, कुलदीप सावळे, गौतम सावळे ,गंभीरराव तायडे ,साधना तायडे, हर्षदीप तायडे आदींसह विशाखा महिला उपासिका संघ, भीम योद्धा युवक मंडळ आदींची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे वैशाख पौर्णिमेला पिंपळ वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्याच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment