कु.मयुरी कुबडे हिचे दहावीत घवघवीत यश....

कु.मयुरी कुबडे हिचे दहावीत घवघवीत यश
___________________________________
प्रतिनिधी श्रावण भातखडे 
नांदेड : येथील नेहरू इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दहावी शिकणारी कु.मयुरी अशोक कुबडे हिने दहावी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. मयुरी कुबडे ही नांदेड येथील नेहरू इंग्लिश स्कूल सोमेश कॉलनी नांदेड या शाळेची विद्यार्थिनी असून नुकताच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे.या परीक्षेत मयुरी कुबडे हिने ७५ % गुण घेतले आहेत. अथक परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अभ्यास करून हे यश मयुरी कुबडे हिने संपादन केले आहे. प्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार अशोक कुबडे यांची ही मुलगी आहे. इयत्ता दहावीत मिळालेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावेळी दत्ता डांगे,विजयकुमार चित्तरवाड,माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, जि.पण.सदस्य साहेबराव धनगे, पंडित पाटील,आनंद पुपलवाड,शितल शहाणे आदींनी तसेच आजोबा रामचंद्र कुबडे,अशोक कुबडे अर्चना कुबडे, सुनील कुबडे,वनिता कुबडे आदी परिवारातील मंडळींनी तिचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे