बार्शिटाकळी कापसी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

बार्शिटाकळी कापसी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू 

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदखेड मोरेश्वर कापसी रस्त्यावर शनिवारी 25 मे रोजी एका दुचाकी चालकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संघपाल प्रकाश अंभोरे असे मृताचे नाव असून तो संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असून तो वैयक्तिक कामानिमित्त चोंढी पातूर येथील सासरवाडी बार्शिटाकळी येथे आला होता. दरम्यान, सिंदखेड कापसी रस्त्यावर त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 37 यू 4167 ला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बार्शिटाकळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे