अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आठ कर्मचारी 30 जुनला एकाच दिवशी सेवानिवृत्त...
अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आठ कर्मचारी 30 जुनला एकाच दिवशी सेवानिवृत्त, 
प्रतिनिधी श्रावण भातखडे
अकोला : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील
नियत वयानुसार 58 यावर्षी आपल्या प्रदीघआरोग्य सेवेनंतर जिल्ह्यावर विविध पदावर काम केलेले आरोग्य कर्मचारी दि.30जुन2024 रोजी आरोग्य पर्यवेक्षक, स्वस्त अभ्यंगता, आरोग्य सेविका, वेगवेगळ्या पदावर काम करणारे एकूण आठ कर्मचारी सेवानिवृत्ती होत आहे,
विष्णू लाड आरोग्य पर्यवेक्षक पंचायत समिती कार्यालय पातुर, श्रीमती रत्नमाला कानकीरड आरोग्य पर्यवेक्षक पंचायत समिती कार्यालय बार्शीटाकळी,माणिक गोलवाडे आरोग्य पर्यवेक्षक पंचायत समिती कार्यालय बाळापुर, नंदा किरडे आरोग्य सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव,आशा इंगळे आरोग्य सेविका आलेगाव , यशोदा खोडके आरोग्यसेविका सस्ती ,मनोरमा श्रीराम खाडे आरोग्य सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्र मुळगाव, रेखा भरतराव बगाडे आरोग्य साहीयीका प्राथमिक आरोग्य केंद्र आगर, हे कर्मचारी दिनांक 30 जून 2024 रोजी जिल्हा परिषद आरोग्य , विभागातून सेवानिवृत्त होत आहेत,
अकोला जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार घ्या महाराष्ट्र राज्य नर्सेस
व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांची मागणी आरोग्य विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून जिल्हास्तरावर वरिष्ठाकडून सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळा संपन्न करा ही मागणी संघटने करून बरेच दिवसापासून सुरू आहे याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागतुन सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विभागात तालुका कार्यालय जिल्हा आरोग्य कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्माचाऱ्यांचा सेवा निवृत्तीच्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय आरोग्य विभाग येथे सत्कार घेण्यातयावा अशी संघटनेची मागणी आहे व पाठपुरावा सुरू आहे, संघटने कडून सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार घेण्यात येतेअशी माहिती महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांनी दिली आहे,
Comments
Post a Comment