मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळेत सिरातून नबी कार्यक्रम..

मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळेत सिरातून नबी कार्यक्रम..
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : येथील अकोली वेस मधील मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळेत सिरातून नबी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वर्ग एक ते पाच मधील विद्यार्थ्यांनी नाते
शारीफ व तकरीर सादर केले. सदर कार्यक्रम मौलवी अब्दुल सलाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला प्रमुख उपस्थितीत मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक सस्थेचे अध्यक्ष सैय्यद आसिफ वकील, सचिव अनिस इकबाल, सदस्य हाजी अब्दुल कादिर, मासूम खान, शाहिद इकबाल,  सै रहीम, मुख्याध्यापक मोहम्मद इराफान, माजी मुख्याध्यापक शकीलुद्दीन, नसरुल्ला खान, मौहम्मद शकील, अजीमोद्दीन यांच्या सह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. संचालन व आभार मो. इरफान यांनी मानले

👉शासकीय आदेश डावलून जलसिंचन विहीर मंजूर !•       
👉शासनाच्या मागेल त्याला विहीर योजनेचा बट्ट्याबोळ
👉उच्च न्यायालयात याचिका दाखल


बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी पंचायत समितीचे जबाबदार अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय आदेश व नियम डावलून मनमानी पद्धतीने वाटेल तशाप्रकारे विहिरी मंजूर केल्या आहेत. यासंदर्भात जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी व संबंधिताकडे तसेच विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषेवर कारवाई केली नही त्यामुळे साल्पी वाल्पी गावातील शेतकयांनी इच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल केली आहे. त्या सदर्भातील पत्र बार्शिटाकळी पंचायत समितीला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग मुंबई येथे राज्यातील सां गटविकास अधिकाऱ्याांची ११ ऑक्टोबर २०२३ ला एक महत्त्वपूर्ण सभा घेऊन मागेल त्या शैलकन्याला विहीर याप्रमाणे तात्काळ सदर योजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होले यानंतर बार्शिटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी अनेक महिने उशिरानंतर २४ जानेवारी २०२४ ला तालुक्यातील १३ गावांतील ११८ विहिरीना तांत्रिक मंजुरी दिली होती. यानंतर तालुक्यात अनेक पात्र शेतकऱ्यांना डावलून जलसिंचन विहिरी मजूर केल्या होत्या. या संदर्भात विविध वत्रमानपत्रामध्ये वारंवार सत्यनिष्ठ बातम्या प्रकाशित झाल्या होत्या, हे विशेष तसेच सात्पी, वाल्पी गावातील उपसरपंच, सदस्य व
शेतकऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यानंतर सदर विहिरीला स्थगितीही देण्यात आली होती परंतु मुख्य कार्यपालन अधिकारी बी वैष्णवी यांनी सदर तक्रारदारांची तक्रार निरर्थक करून यावरील स्थगिती हटविली होती. यानंतर विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली होती परंतु त्यांनीही दखल घेतली नाही. अखेर साल्पी वाल्पी गावातील ज्ञानदेव रामराव बीबीनायके यानी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे १० सप्टेंबरला याचिका दाखल केली. यामध्ये राज्य शासन व अनेकांना प्रतिवादी करण्थात आहे आहे. उच्च न्यायालयाकडून काही दिवसांपूर्वी बार्शिटाकळी पं.स. ला एका बंद लिफाफ्यात एक हमदस्त प्राप्त झाले होते. यामध्ये २१ ऑक्टोबरला उच्च न्यायालयात तारीख असल्याचे समजले. याबाबत बार्शिटाकळीचे गटविकास अधिकारी रविकांत पवार यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता. पं.स.तील पंचायत अधिकारी रमेश चव्हाणा व इतर उच्च न्यायालय नागपूरता वकालतनामा दाखल करण्याकरिता गेल्याचे सांगितले. तर रमेश चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवर रात्री उशिरा संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे