संगीताताई जाधव राज्यस्तरीय डॉ.अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित....
संगीताताई जाधव राज्यस्तरीय डॉ.अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित....
बार्शिटाकळी : तथागत बहुउद्देशीय संस्था, मेहकर द्वारा आयोजित, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना, राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट,व जिजामाता हाँस्पिटल महिला आरोग्य केंद्र सिंदखेडराजा यांच्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथे दी. २७/१०/२०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे भव्य रक्तदान शिबीर,अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच नेत्र तपासणी शिबीर, भव्य नागरी सत्कार समारंभ व राज्यस्तरीय भव्य पुरस्कार वितरण सोहळा* कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष संगीता ताई जाधव यांना राज्यस्तरीय साहित्य लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष संदीप गवई हे होते. मार्गदर्शक म्हणून सुनील वनारे अकोला हे होते.
संगीताताई जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या उत्कृष्ट कार्याची व सामाजिक कार्याची दखल घेत अकोला जिल्ह्यातील आरोग्य महिला कर्मचाऱ्या सोबतच जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष संगीता जाधव यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी केलेली कार्य त्यांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सतत लढा देत असतात.
संगीताताई जाधव यांनी ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अकोला जिल्ह्यात एक चळवळ उभारलेली आहे, या चळवळीत त्यांनी आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व (आयुष्यमान आरोग्य मंदिर ) प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतात " संघटना आपल्या दारी " या संकल्पने तुन राज्य अध्यक्ष अशोकराव जयसिंगपुरे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हाभर काम करीत आहेत.
अकोला जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात व आरोग्य विभागातील केलेल्या उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यासाठी हक्कासाठी लढा देत असणाऱ्या आंदोलन करून जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या महिलांसाठी व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी यशाच्या शिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराष्ट्रतील कर्तृत्ववान व्यक्तींचा त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल तसेच कर्तृत्वाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यांनी अकोला जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये आपली मोठी भूमिका बजावली अशा कर्तुत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे,अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग़्य कर्मचारी संघटना अकोला जिल्हाध्यक्ष संगीता ताई जाधव यांनी
आपल्या जिल्ह्याचे नाव लौवकिकतेसाठी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्य विकास कार्यास योगदाना बद्दल त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
Comments
Post a Comment