नातिकोद्दिन खतीब ह्यांच्या उमेदवारी वर नियमबाह्य आक्षेप घेण्याची प्रक्रिया वंचित बहुजन आघाडीने यशस्वी होऊ दिली नाही.
नातिकोद्दिन खतीब ह्यांच्या उमेदवारी वर नियमबाह्य आक्षेप घेण्याची प्रक्रिया वंचित बहुजन आघाडीने यशस्वी होऊ दिली नाही.
बार्शिटाकळी : आज दि ३०/१०/२४ रोजी २९ बाळापूर - विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छानणी प्रक्रिया पार पडली.त्यावेळी विरोधकांनी ज्यांचा निवडणुक प्रक्रिये सोबत काही संबंध नाही अश्या व्यक्तीला आक्षेप दाखल करण्यासाठी पाठविले होते.नातिकोद्दिन खतीब ह्यांच्या उमेदवारी वर आक्षेप घेण्यासाठी त्यांनी अर्ज सादर केला.निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ह्यांनी देखील त्याचा अर्ज स्वीकारून एड संतोष रहाटे ह्यांनी एक प्रत त्यांना मिळाली म्हणून सही करून द्यावी असे सांगितले.त्यावर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव मा. राजेंद्र पातोडे ह्यांनी निवडणुक निर्णय अधिकारी ह्यांचे कडून निवडणुक प्रक्रिये सोबत काहीही संबंध नसलेल्या व्यक्ती कडून आक्षेप स्वीकारला जाण्याची कृती आणि अर्ज स्वीकारून त्यावर आमचे वकिला कडून रिसिव्ह म्हणून स्वाक्षरी मागण्याचे कृती वर आक्षेप घेतला.त्यावर एड. संतोष रहाटे ह्यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम नुसार उमेदवार सूचक किंवा अधिकार पत्र असलेली व्यक्ती छाननी प्रक्रियेत सहभाग घेवू शकते हे निदर्शनास आणले.०२९ बाळापूर विधानसभा मतदारसंघातील सूचक किंवा उमेदवार नसल्याने निवडणुक निर्णय अधिकारी ह्यांना नातिकोद्दीन खतीब ह्यांचे विरोधात दाखल केलेला नियमबाह्य आक्षेप अर्ज परत करण्यास भाग पाडले.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड सैय्यद नातीकोद्दीन खतीब ह्यांचा उमेदवारी अर्ज परिपूर्ण असल्याने कुठ्ल्याही मंजुर झाला.विरोधकांना खतीब ह्यांचे विरुद्ध निवडणुक प्रक्रिया सुरू करून त्रास देण्याचा डाव वंचीतच्या सजग पदाधिकारी ह्यांनी यशस्वी होऊ दिला नाही.
नामनिर्देशन अर्ज छाननी वेळी राजेंद्र भाऊ पातोडे, पक्षाचे उमेदवार ॲड सैय्यद नातीकोद्दीन खतीब,वंचित बहुजन आघाडीचे कायदेशिर सल्लागार ॲड संतोष राहाटे व ॲड सुबोध डोंगरे , ॲड मिनल मेंढे तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर , जिल्हा उपाध्यक्ष निलेश इंगळे , जिल्हा प्र. प्रमुख सचिन शिराळे , जिल्हा प्रवक्ता धमेंद्र दंदी, ॲड प्रशांत उमाळे , ॲड मुदसिर , ॲड पि एच वानखडे , युवा आघाडी तालुका अध्यक्ष सुगत डोंगरे , उपाध्यक्ष राजदार खान , एनोददीन खतीब , छाननी दरम्यान पदाधिकारी उपस्थित होते.
Balasaheb Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi Rajendra Patode
#MaharashtraAssembly2024
#VoteForVBA #VoteForGasCylinder
#Balapur - 29
Comments
Post a Comment