महान येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात
महान येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात
बार्शिटाकळी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित निकाल समोर आल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम संदर्भात महान बस स्थानक चौकात स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे.
११ डिसेंबर रोजी महान बस स्थानक चौक येथे वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने ईव्हीएम विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथे ७५५ जनतेने ईव्हीएम हटाव मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ह्यावेळी तालुका कार्याध्यक्ष गोरशिग राठोड, राजेश खंडारे, दादाराव सुरडकर, गोबा सेठ, जावेद भाई, जब्बार भाई , गजानन सुरजुसे, शुध्दोधन इंगळे, अशोकराव लोणाग्रे, निलेश चव्हाण, दिलीप भाऊ बजर, शुद्धोधन राऊत, हा कार्यक्रम महान बस स्टॅन्ड चौक या ठिकाणी घेण्यात आला अंदाजे ७५५ स्वाक्षरी झाल्या वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. (ता.प्र.)
Comments
Post a Comment