परभणीतील घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निषेध..

परभणीतील घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निषेध
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने परभणी येथे संविधानाच्या शिल्पाची झालेल्या तोडफोड प्रकरणाचा निषेध नोंदवून या प्रकरणातील दोषींना व माथे भडकविण्याचे काम करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बार्शिटाकळी चे तहसीलदार राजेश वझीरे यांची भेट घेऊन मा . मुख्यमंत्री यांना परभणी येथील जातीयवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली या घटनेला दोन दिवस झाल्यानंतरही या घटनेतील मास्टर माइंड व त्याला सहकार्य करणाऱ्या दोषी लोकांवर कारवाई व गुन्हे दाखल झाले नाही घटनेतील मास्टर माइंड व संबंधित टोची लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्तीतील निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली (कॉबिंग ऑपरेशन) कारवाई त्वरित थांबवावी आणि याप्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द‌ करण्यात यावे ही मागणी बंचित बहुजन आधाड़ी अकोला जिल्ह्याच्या वतीने या निवेदनाद्‌वारे करण्यात येत आहे
 जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निवेदन देण्यात आले. तर संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बार्शिटाकळी तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, अजय अरखराव,, गोपाल चव्हाण, सतीश पवार, सिंहासन जाधव, शुद्धोधन इंगळे, अशोक लोणाग्रे, सुनील शिरसाट, रोहिदास राठोड, दादाराव पवार, गजानन फाळके, अमोल जामनिक, अनिल खंडारे, भूषण सरकटे, गोपाल राठोड, मनोहर वावर वाघ, भास्कर सरदार, उज्वला ताई गडलिंग, कांचन ताई भगत, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या देशात आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सुरू आहे. सरकारकडून अशा अनेक घटना आळा घालण्यासाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसून येत नाहीत, उलटपक्षी अशा प्रकरणातील दोषींना पाठबळ देण्याचे काम सरकार करताना दिसत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. परभणी येथे संविधानाच्या शिल्पाची झालेल्या तोडफोड प्रकरणानंतर दलित वस्तीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करून विनाकारण दलित बांधवांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. यामुळे संविधान विरोधी शक्तींची हिम्मत वाढत आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे