अखेर...बार्शिटाकळी ते पिंपळखुटा रस्ता कामाचा शुभारंभ..

अखेर...बार्शिटाकळी ते पिंपळखुटा रस्ता कामाचा शुभारंभ..
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : अकोला तालुक्यातील कुंभारी ,शिवनी व बार्शिटाकळी तालुक्यातील विझोरा ,पिंपळखुटा व धाबा ह्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामात अनियमितता आढळल्याने सदरचे कंत्राट रद्द .नव्याने काम सुरु करण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती. परंतु दैनिक दिव्य मराठी मध्ये याबाबतचे वृत्त प्रसारित झाल्यावर सदर काम सूरू होण्याच्या हालचाली सूरू झाल्या होत्या.
आज दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी अखेर सदर रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की  शिवनी कुंभारी विझोरा पिंपळखुटा धाबा प्रजिमा २० या मार्गावर ८/०० ते १०/०० वर मंगलम इंफ्रा  मार्फत रस्त्याचे काम सुरु होते. रस्ता कामात अनियमितता असल्याच्या तक्रारीमुळे ,संबंधीत अधिकाऱ्यांनी दि.२३.०९.२०२४ ला रस्त्याची पाहणी केली होती .त्यावेळी रस्त्यावर मंगलम इन्फ्रा यांनी केलेले Carpet व Seal Coat पूर्णपणे दबलेले व  पूर्ण लांबी मध्ये खड्डे पडलेले आढळुन आले होते .  सदरील ठिकाणी नुसत्या carpet व seal coat नि  दुरुस्ती शक्य नाही व ते करण्यातही येऊ नये असे संबंधित अधिकाऱ्यांनी मंगलम इन्फ्रा यांना दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे . ते म्हणतात सदर लांबी मध्ये पडलेले खड्डे काढून रस्त्यावर पूर्णपणे MPM करूनच Carpet व Seal Coat करावे .असे केले असताच रस्त्याला मजबुती येईल.मंगलम इन्फ्रा यांना  दि. २४ सप्टेंबर २०२४,१६ ऑक्टोबर २०२४ व २२ नोव्हेंबर २०२४ असे तीन वेळा लेखी आदेश देवूनही संबंधित कंत्राटदार त्यांना जुमानत नसल्याचे दिसून येत होते.कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या वेळकाढूपणा मुळे पिंपळखुटा ते बार्शिटाकळी मार्गावरील नागरी वस्त्यांमध्ये ,ह्या रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या गौण खनिजाच्या जड वाहनामुळे धुळच धुळ उडते .. परिणामी हया परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ ह्या रस्त्याचे काम सुरु करण्याचे आदेश द्यावे व निष्पाप नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा अन्यथा ह्या परिसरातील नागरिक मोठे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा दिल्याचे ,सामाजिक कार्यकर्ते अमोल जामनिक व सचीन आगाशे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगीतले होते. विविध वत्रमानपत्रामध्ये बातमीच्या प्रभाव व आंदोलनाच्या ईशाऱ्यामुळे आज दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी उपस्थित नागरीक व सामाजिक कार्यकर्त्याच्या उपस्थितीत कामास प्रारंभ झाला... यावेळी अभियंता आकाश आगरकर, शंभू सेना तालुका अध्यक्ष सचिन आगाशे, वंचित बहुजन युवा आघाडी.मा.तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, दिपक कळसाईत, संतोष मार्कंड, गणेश खोपे, अंकुश कुरुसूंगे , उमेश कोकाटे, वकील जामनिक, प्रतीक धाईत, गणेश वाघमारे , रक्षक जाधव ,बंडु भगत, विशाल हाडोले, सुमित इंगळे, चेतन जामनीक, गजानन पवार , अमित क्षिरसागर, मंगेश वानखडे ,विशाल जामनिक , शाम खंडारे, प्रशांत दामोदर, देवेंद्र आगाशे आणि विशाल गवई हे उपस्थीत होते. काम सूरू झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले.


आमच्या आंदोलनाचा ईशारा व दैनिक दिव्य मराठीच्या बातमीचे पाठबळ मिळाल्यामुळे हया रस्त्यालगत राहणारे नागरीक व सदर रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना धुळीपासून मुक्तता मिळत आहे. सोबतच चांगला रस्ता सुध्दा... सामाजिक कार्यात सदैव मदत करणाऱ्या दैनिक दिव्य मराठीचे मनपुर्वक आभार.
अमोल जामनिक 
सचिन आगाशे अणि वार्ड नं.०२मधील रहिवाशी 
बार्शीटाकळी 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे