संत सेवालाल महाराज तांडा सुधार समितीच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार....

संत सेवालाल महाराज तांडा सुधार समितीच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीता ताई अढाऊ यांनी त्यांना असलेल्या अधिकाराने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संत सेवालाल महाराज तांडा सुधार समिती मध्ये सिंहासन जाधव, सतीश मखराम पवार, एड विक्रम जाधव, गोपाल चव्हाण यांची नियुक्ती करण्याची शिफारस आली होती परंतु अकोला जि प अध्यक्ष यांनी शिफारस केलेल्या सदस्याची निवड न करता महाराष्ट्र शासनानाच्या ग्रामविकास मंत्रालयातून शासन स्तरावरून अकोला जिल्हा परिषद प्रशासक असल्याचे दाखवून शासन स्तरावरून चार सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या त्या विरोधात जि प अध्यक्ष यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये काही दिवसापूर्वी याचिका दाखल केली होती या याचिकेवर दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने ग्रामविकास मंत्रालयाने केलेल्या निवड रद्द करून अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी सुचवलेले चारही सदस्य नियुक्ती कायम ठेवण्यात यावे असा आदेश दिल्यानंतर शासन स्तरावरून निवड झालेल्या चार सदस्यांच्या नियुक्ती रद्द करून जि प अध्यक्ष यांनी सुचवलेले तांडा समिती सदस्य कायम ठेवण्यात आल्याचा आदेश काही दिवसापूर्वी देण्यात आल्यामुळे दोन्ही समित्यांमध्ये जि प अध्यक्ष यांनी सुचवलेल्या तांडा समिती सदस्य यांची निवड कायम झाल्यामुळे आज त्यांचा सत्कार जि प अध्यक्ष संगीता ताई अढाऊ यांच्या दालनात करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच एड संतोष रहाटे ,धीरज इंगळे,  गजानन गवई,  दिनकर खंडारे , गोरसिंग राठोड, किशोर जामनिक ,  शरद इंगोले , पवन बुटे , मोहन तायडे , सुरेंद्र सोळंके ,  आकाश शिरसाट , संदीप शिरसाट , निलेश सोनाग्रे, निखिल गावंडे , नितीन सपकाळ , शंकरराव राजुस्कर,  सतीश चोपडे , प्रभाकर अवचार , संजय निलखन , प्रदीप पळसपगार , संजय किर्तक , मनोहर वानखडे , प्रसिक मोहोळ , चरण सिंग चव्हाण , दादाराव पवार , शुद्धोधन इंगळे  , डॉ बागडे , निखिल शिरसाट , आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे