माजी सरपंचाचे आजपासून उपोषण ! ■ रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप. ■ सा.बां. विभाग अकोला येथे दिली होती तक्रार..
माजी सरपंचाचे आजपासून उपोषण !
■ रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप
■ सा.बां. विभाग अकोला येथे दिली होती तक्रार
बार्शिटाकळी : तालुक्यातील पिपंळखुटा ते बार्शिटाकळी या रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्यामुळे तो निकृष्ट दर्जाचा बनला आहे. या कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अन्यथा २३ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसणार, असा इशारा पिळपखुट्याचे माजी सरपंच संतोष जाधव यांनी मुख्यमंत्री व कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग अकोला यांना १३ डिसेंबरला दिलेल्या तक्रारीतून दिला होता
सहर तक्रारीत म्हटले की कामाचे भूमिपूजन करताना रस्त्याच्या कामासंदर्भात माहिती असलेले फलक लावले होते ते काढण्यात आले, सदर कामे १३ ऑक्टोबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक होते
परंतु तसे झाले नाही, सदर काम करतांना निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून खोदकाम करताना दीड फूट खोली करने आवश्यक होते परंतु अर्धा ते एक फूट खोली करून अनेक ठिकाणी कॅपिग न करता जीएसटी टाकण्यात आली तर काही ठिकाणी साहित्याचा वापर करण्यात आला साडेचार कोटी रुपये खर्चाचे सदर काम शासकीय इस्टिमेटनुसार करण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारीतुन केला आहे. या कामाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई न केल्याने २३ डिसेंबर पासून माजी सरपंच संतोष जाधव हे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला याच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत
धुळीमुळे शेती पिकांसह मानवी आरोग्यावरही परिणाम
सदर रस्त्यांवरून पिपळखुटा,गोरव्हा, विझोरा, कातखेड, एरंडा, पंरडा, राहित, साहित येवता , कुंभारी, एमआयडीसी, अकोला अशी वाहतूक सुरू असते तसेच या रस्त्यांवरून रात्रंदिवस सतत गौण खनिजांच्या जड वाहतुकीची सतत वर्दळ असते. रस्त्याच्या कामात मातीचा वापर केल्याने या रस्त्यावरील धुळीमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . या भागाचे जबाबदार अधिकारी हे संबंधित कंत्राटदाराला अभय देत असल्याचा आरोपही सदर तक्रारीतुन केला आहे
रूद्रायणीदेवी गडाजवळील दुकान जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी: येथून जवळच असलेल्या रुद्रायणीदेवी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुकानाचे भाडे देण्यास नकार दिल्याने दुकान जाळण्यात आले. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून बार्शिटाकळी पोलिसांनी एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. चिंचोली रुद्रायणी येथील नारायण जगन्नाथ वर्गे यांनी पोलिसात १६ डिसेंबरला दिलेल्या फिर्यादनुसार, त्यांचे रुद्रायणीदेवी गडाच्या पायथ्याशी धार्मिक साहित्य, खेळण्याचे साहित्य, बेन्टेक्स ज्वेलरी, भांडी यांचे दुकान आहे. १५ डिसेंबरला संध्याकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. त्याच रात्री अंदाजे १०
वाजेच्या सुमारास फोनवरून दुकान जळाल्याची माहिती मिळाली. त्यांनी व गावातील अनिरुद्ध पाटील खंडारे यांनी दुकानाला भेट दिली दुकान जळत होते. मात्र परिसरात पाण्याची व्यवस्था नसल्याने आग विझविता आली नाही. माझ्या दुकानाला राजेंद्र प्रल्हाद आकोत यांनी दुकानाचे भाडे दिले नसल्याने आग लावली, असा आरोप पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केला आहे. यावरून पोलिसांनी २१ डिसेंबरला कलम ३२६ (९) बीएनएसनुसार राजेंद्र प्रल्हाद आकोत याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील टपास बार्शिटाकळीचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार करीत आहेत. (प्रतिनिधी)
Comments
Post a Comment