संगीताताई जाधव यांना वूमन आयकॉन २०२४ पुरस्कारने सन्मानित.

संगीताताई जाधव यांना वूमन आयकॉन २०२४ पुरस्कारने सन्मानित. 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : हज़रत ग़ौस ए आज़म दस्तगीर बाबा च्या ४५व्या उर्स शरीफ आणि निशान निमित्याने सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे प.पु.गुरुवर्य अल्हाज असदबाबा यांच्या स्मृति पित्यार्थ दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी हज़रत गौस- ए-आज़म दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था, असनाज हेल्थकेयर एजुकेशन एंड रिसर्च फाउंडेशन द्वारा आयोजित भारत गौरव श्री. एच एच असद बाबा मेमोरियल अल्लाह असद बाबा वूमन आयकॉन पुरस्कार व मोफत कर्करोग (कॅन्सर), अस्थिरोग तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनाच्या जिल्हाध्यक्ष संगीता ताई जाधव यांना वुमन आयकॉन पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी प्रामुख्याने रमाकांत देशपांडे चेअरमन, स्वामी देवेंद्र बालब्रह्मचारी, नजमोनिसा शेख अध्यक्ष, डॉक्टर अमजद खान पठाण चेअरमन असनाज हेल्थकेअर एज्युकेशन मुंबई, एच डी ओ सिंदखेडराजा संजय खडसे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग़्य कर्मचारी संघटना अकोला जिल्हाध्यक्ष संगीता ताई जाधव यांना आपल्या देशाच्या नाव लौवकिकतेसाठी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्य विकास कार्यास योगदान योगदानाबद्दल अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अकोला बार्शीटाकळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरीसरप येथे सेविका पदावर कार्यरत असलेल्या संगीता ताई जाधव यांना हजरत गौर आजम दस्तगीर बहुउद्देशीय संस्था सिंदखेड राजा पुरस्कारने 2024 सन्मानित सदर पुरस्कार हा 26 डिसेंबर 2024 सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे सन्मानपूर्वक देण्यात आले.
संगीताताई जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या उत्कृष्ट कार्याची व सामाजिक कार्याची दखल घेत अकोला जिल्ह्यातील आरोग्य महिला कर्मचाऱ्या सोबतच जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष संगीता जाधव यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी केलेली कार्य त्यांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सतत लढा देत असतात.संगीताताई जाधव यांनी ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अकोला जिल्ह्यात एक चळवळ उभारलेली आहे, या चळवळीत त्यांनी आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व (आयुष्यमान आरोग्य मंदिर ) प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतात " संघटना आपल्या दारी " या संकल्पने तुन राज्य अध्यक्ष अशोकराव जयसिंगपुरे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हाभर काम करीत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे