संविधान विटंबना प्रकरणातील दोषींवर कारवाई करा 👉सुर्यवंशीं यांच्या मृत्यूची उच्चस्तरिय चौकशीची मागणी
👉संविधान विटंबना प्रकरणातील दोषींवर कारवाई करा
👉सुर्यवंशीं यांच्या मृत्यूची उच्चस्तरिय चौकशीची मागणी
बार्शिटाकळी, ता. २० परभणी येथे घडलेल्या संविधान विटंबनेच्या घटनेमुळे समाजातील नागरीकांन मध्ये तिव्र दुखः आणि संताप व्यक्त होत आहे. संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी २० डिसेंबर रोजी भिम वाटीका ते तहसिल कार्यालया पर्यंत सर्व जाती धर्मातील नागरीकांच्या वतीने संविधान गौरव रेती काढून राजेश वझीरे तहसिलदार बार्शिटाकळी यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
संविधानाचा अपमान हा आपत्या लोकशाहीतील मूलभूत तत्त्वांवर आघात आहे.
तसेच, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यूबाबत आम्हाला तीव्र खेद वाटतो. या घटनांच्या निषेधार्थ शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या अनेक तरुणांवर पोलिसांनी अन्यायकारकपणे गुन्हे दाखल केले आहेत. ज्यामुळे समाजात असंतोषाची भावना वाढत आहे. संविधानाचा अपमान व विटंबना प्रकरणातील दोर्षीवर तात्काळ कठोर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. सोमनाय सूर्यवंशी यांची पोलीस कोठोडीत झालेल्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष करण्यात पावी, व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अमोल जामनिक, सुनिल शिरसाठ, मिलींद खाडे, तमीज खा, राजेश खंडारे, इम्रान खान, संतोष सुरडकर, संतोष गवई, नईमोद्दीन शेख, सै. रियासत, गोरसिंग राठोड, अनिल धुरंधर, प्रकाश खाडे, भुषन गायकवाड, सचिन आगाशे, आर के जाममिक, श्रावण भातखडे, सिद्धार्थ इंगळे, रूपाली करवते, नर्मदाबाई शिरसाट, कमलाबाई जामनिक, रमाबाई जामनिक, वैशाली सुरडकर, वेदिका खंडारे, ऊमा तायडे, हर्षा खाडे, राधा ईगळे, कविता जामनिक, सोनु गोपनारायण, ए, एम मनवर, यशवंत पुडगे, आर एस. जाधव, प्रविण जामनिक, रोहित खडे, निखील जामनिक,बोदीराम करवते, एम.डी. वानखडे, आदीसह शेकडो नागरीक यावेळी उपस्थित होते.
दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरू
परभणीच्या घटनेची सरकारने सखोल चौकशी करावी. निरपराधांना पकडल्यापेक्षा जे दोषी आहेत त्यांचा शोध घेण्याची गाज आहे. आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास जिल्हयातच नव्हेतर राज्यभर चक्काजाम करू असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment