महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेची त्रेमासिक आढावा सभा संपन्न....
महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेची त्रेमासिक आढावा सभा संपन्न.
बार्शिटाकळी : महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारीअकोला ची महत्त्वपूर्ण त्रेमासिक सभा दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी आरोग्य कर्मचारी पतसंस्था येथे पार पडली, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री विष्णू लाड यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा पार पडली, यावेळी संघटनेचे अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली.जिल्ह्यातील रखडलेली पदोन्नती, एस नाईन श्रेणी बद्दल बाबत,प्रत्येक उपकेंद्रावर डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्याबाबत, आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव बदली बाबत,आरोग्य कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर देण्यात यावी, आदी विषयावर चर्चा करण्यात आली, यावेळी सभासद नोंदणी , वार्षिक वर्गणी जमा करण्याचे ठरविण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य नर्सेस आरोग्य कर्मचारी संघटनेला संघटनेचे उपाध्यक्ष विष्णू लाड साहेब यांनी ५००१ रुपये आर्थिक निधी दिल्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी प्रामुख्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगीताताई जाधव, जिल्हा सरचिटणीस संजय डाबेराव, जिल्हा सचिव रामरतन मेटागे, जिल्हा सचिव रवी राठोड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रितेश वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष रूपालीताई तुपोने, जिल्हा सल्लागार वृंदाताई ताई विजय कर, जिल्हा मार्गदर्शक गजानन इंगळे, जिल्हा सल्लागार धम्मपाल खंडारे, जिल्हा सदस्य मनोहर घुगे, जिल्हा सदस्य विश्वनाथ कांबळे, पातुर सचिव सुनील कराळे, अकोट मार्गदर्शक शरद ठाकूर, तेल्हारा तालुका अध्यक्ष भारती मोरवाल, आपले मनोगत व्यक्त केले संघर्ष मधील संघटन वाढवणे वर्ग झोडगा आरोग्य सेविका आम्रपाली जाधव, जिल्हा सदस्य लक्ष्मी सोळंके, कार्यक्रमाचे संचालन विभा ताईं पाथरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपाली तुपोने यांनी मानले.
Comments
Post a Comment