आरोग्य सहायिका मंजू घन यांचा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्ती पर सत्कार..
आरोग्य सहायिका मंजू घन यांचा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्ती पर सत्कार..
बार्शिटाकळी : महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप येथे कार्यरत श्रीमती मंजू घन ह्या वयो मर्याद्या नुसार आज दिनांक 28/ 2/25 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरीसरप येथे सेवानिवृत्त होत आहेत त्याकरिता महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला वतीने संगीता जाधव जिल्हाध्यक्ष ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन मंजू घन यांचा सत्कार केला सूत्रसंचालन संघटना कोषाध्यक्ष मंगला तितुर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता चव्हाण संघटना जिल्हा संघटक यांनी पार पाडले सत्कार समारंभाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गमे ,नरेश , शुभम महापुरे, शितल तेलगोटे, प्रियंका मोरे, अंजली, राजकुमार महल्ले, श्रीकृष्ण शेळके, सुरेखा घुगे, अलका जाधव, चंदन उपराथ असे सर्व कर्मचारी हजर होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी सरप येथे कर्करोग मोबाईल व्हॅन द्वारे तपासणी मोहीम,
बार्शिटाकळी : तालुका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप येथे कर्करोग मोबाईल व्हॅन द्वारे तपासणी मोहीम यशस्वीरित्या पार पडली.
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन कर्करोगा विरोध लढा देऊन योग्य औषध उपचार आणि निरोगी राहण्याकरिता कर्करोग मोबाईल व्हॅन द्वारे पैगंडावस्थेत किशोरवयीन मध्ये भविष्यात होणाऱ्या स्तनांचा कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो त्यासाठी योग्य व्यायाम योग्य आहार व धूम्रपान टाळून कर्करोगा विरुद्ध लढून जिंकू शकतो व याविषयी योग्य जागृतीची लढाई लढण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कर्करोग सप्ताह राबवल्या जात आहे बार्शीटाकळी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली डॉक्टर रवींद्र आर्या तसेच प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन राठोड , डॉ. गमे सर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्त आरोग्य कर्मचारी यांनी बार्शीटाकळी तालुका अंतर्गत येत असलेल्या सर्व तीस वर्षांवरील एकुण ७७ महिलांची बीपी शुगर व व्हि.आय.ए., हिमोग्लोबिन ही आहे तपासणी करून अपेक्षित कर्करोगा च्या महिला शोधण्याची मोहीम उभारलेली आहे करिता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र आर्या यांचे मोलाचे मार्गदर्शन या कर्मचाऱ्यांना लाभलेले आहे
Comments
Post a Comment