प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमाणपत्र ग्रामसभेत वितरण......घरकुल धारकांमध्ये आनंदाचे वातावरण...
प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमाणपत्र ग्रामसभेत वितरण......
घरकुल धारकांमध्ये आनंदाचे वातावरण...
बार्शिटाकळी :बार्शिटाकळी पंचायत समिती अंतर्गत टाकळी छबिले येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये संबंधित अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल मंजुरीसाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मंजूर घरांच्या बांधकामासाठी घरबांधणीच्या टप्प्यानुसार 1 लाख 20 हजार रुपये अनुदान चार हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जाईल. याशिवाय रोहयो अंतर्गत 26,430 रुपये, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12 हजार रुपये असे एकूण 1 लाख 58 हजार 730 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. घराचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे, ज्याचे क्षेत्रफळ किमान 25 चौरस मीटर असावे. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कुटुंबातील महिला व पत्नी या दोघांच्या संयुक्त नावाने ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. घरगुती बांधकाम मार्गदर्शनासाठी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता किंवा राज्यस्तरावर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती ग्रामसभेत देण्यात आली. या ग्रामसभेला नोडल अधिकारी म्हणून संगीता जाधव, ग्रामपंचायत अधिकारी राजेश बंड, टाकळी छबिले सरपंच सारिका नागोराव चव्हाण यांच्यासह सदस्य व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment