बार्शिटाकळीत अखिल भारतीय क्हाडी साहित्य संमेलन उत्साहात.....माह्यी वऱ्हाडी मले शिकवते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपीत पेरली

बार्शिटाकळीत अखिल भारतीय क्हाडी साहित्य संमेलन उत्साहात.....
माह्यी वऱ्हाडी मले शिकवते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपीत पेरली
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : साहित्य व बोलीभाषा संवर्धन संस्था बार्शीटाकळीद्वारा संचालित अखिल भारतीय वन्हाडी साहित्य मंच अकोला यांच्यातर्फे ६ वे अ. भा. बन्हाड़ी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. साधना काळबांडे यांची वैविधयपूर्ण वन्हाडी शब्दांची मांडणी व शैला चेडे यांचे माजघर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
वहाडी साहित्य व बोलीभाषा संवर्धनासाठी २०१५ पासून कार्य करत असलेल्या संस्थेचे वर्षभर वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. वन्हाडी मायबोलीचा जागर व्हावा या हेतूने अ.भा. वन्हाडी साहित्य संमेलनाचे आयेजन केला जमते. आतापर्यंत २०५८, २०१९, २०२०, २०२२,२०२४ मध्ये पाच अ.भा. क्हाडी साहित्य संमेलने पार पडली. वरम्मान सहावे अ.भा. कडाडी साहित्य संमेलन रविवार २३ फेब्रुवारी रविवार रोजी बार्शीटाकळी येथे झाले. सकाळी ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. ग्रंथ दिंडीचे पूजन भारत बोबडे , मनिषा बोबडे, गजाननराव काकड व भावेश पटेल यांच्या हस्ते पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष मागून वन्हाड़ी साहित्यिक तुळशीराम बोबडे होते. उदघाटन तहसीलकर राजेश बंझिरे यांनी केले. स्वागताध्यक्ष महणून समाजसेवक भारत बोबडे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक प्रभाकर चव्हाण, राशीटाकळीचे ठाणेदार प्रकाश तूनकलवार, नागपूरचे वन्हाडी साहित्यिक शंकरराव घोरसे (आध्यक्ष अक्षरक्रांती फाउंडेशन, नागपूर) पुष्पराज गावंडे, मावळते अध्यक्ष किशोर बळी, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. प्रा. राजेश मिरगे (शेगाव) अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाळे आणि समाजसेवक प्रकाशसेठ ढोकणे यांचा समावेश होता. वन्हाडी बोलीभाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी, संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत बेवडे यांच्या सह श्याम ठक, नीलेश कवडे, रवींद्र दळवी, नीलेश देक्कन, पुष्पराज गावंडे, विद्या रामे, अनुराधा धामोडे, साधना काळबांडे, डॉ. मीना सोसे, शैला चेडे, वैशाली गावंडे , होते. त्या आवाहनाला वन्हाडीच्या वारकऱ्यायची मोठी उपस्थिती लाभली. गुरुदेव महीला सेबा व पुरुष सेवा मंडळ आणि दि ग्रेट मराठा मित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.
गाडगेबाबा जयंतीच्या दिवसाला वन्हाडी बोलीभाषा दिवस म्हणून होणार साजरा बन्हाडी साहित्य व बोलीभाषा संवर्धन संस्था बार्शीटाकळी द्वारा संचालित अखिल भारतीय वन्हाडी साहित्य मंचाने आतापर्यंत पाच अ.भा. वन्हाडी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. तसेच विविध प्रकारच्या काव्यलेखन स्पर्धांचे आयोजन करून दिवाळीत अस्सल क्हाडी दिवाळी अंक महणून चिरांगनचे प्रकाशनही करण्यात येते, २३ फेब्रुवारी संत गाडगेबाबा जयंतीच्या दिवसाला बन्हाडी बोलीभाषा दिवस माणून साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली, असे वन्हाडी साहित्य व बोलीभाषा संवर्धन संस्था चाशीटाकळी द्वारा संथाहित अखिल भारतीय वन्हाडी साहित्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष शाम ठक यांनी कळविले आहे 

वऱ्हाडी साहित्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार

वऱ्हाडी साहित्य व वऱ्हाडात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यंदाही पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यात जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक आबासाहेब कडू (अमरावती) यांना जीवनगौरव २०२५, युवा वऱ्हाडी साहित्यिक अजय इंगळे (पळसो बढे) यांना 'यलाई' पुष्पराज गावंडे पुरस्कार, वऱ्हाडी साहित्यिका अश्विनी घुले यांना स्व. सौ. सुमनबाई ठक स्मृतीप्रित्यर्थ महिला वऱ्हाडरत्न पुरस्कार, बार्शिटाकळीचे पत्रकार संजय वाट यांना वऱ्हाडरत्न (पत्रकारिता क्षेत्र) हरिदास रत्नपारखी यांना वऱ्हाडरत्न (समाजसेवा), डॉ.प्रा. सुनील पखाले वऱ्हाडरत्न (साहित्य सेवा) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

शंभु सेनेच्या वतीने अध्यक्षांचा सत्कार 
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
 बार्शिटाकळी : येथे ६ वे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन बार्शिटाकळी येथे आयोजित करून बार्शिटाकळी या ऐतिहासिक शहराला मान दिल्याबद्दल संमेलनाध्यक्ष श्री तुळशीरामजी बोबडे व कार्याध्यक्ष श्री श्याम भाऊ ठक यांचा सत्कार शंभू सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला.
त्यावेळेस शंभू सेना तालुकाप्रमुख सचिन आगाशे, 
रामेश्वर पाटील नानोटे शुभम राजूरकर , तेजस देशमुख

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे