राजनखेड येथे कायदेविषयक शिबिर संपन्न....... महिला दिनानिमित्त उपक्रम.....
राजनखेड येथे कायदेविषयक शिबिर संपन्न......
महिला दिनानिमित्त उपक्रम.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील ग्रामपंचायत राजनखेड येथे उच्च न्यायालय मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांचे निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती बार्शिटाकळी तथा वकील संघ बार्शिटाकळी व ग्रामपंचायत राजनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिर हे सरपंच ईश्वरसिंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले असून त्याकरिता प्रमुख उपस्थिती मध्ये पी. एस. भंडारी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बार्शीटाकळी तथा अध्यक्ष, तालुका विधिसेवा समिती ए. एन. खताडे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर बार्शिटाकळी, सौ अनिता तेलंग उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता)
जिल्हा परिषद अकोला रविकांत पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती बार्शिटाकळी, एस.एस. गडलिंग अध्यक्ष तथा विधीज्ञ संघ बार्शिटाकळी, यांची होती. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व मान्यवरांचे वृक्ष व ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सदर कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून आलेल्या नहेल समीर शेख सी.एम.आर.सी. महिला आर्थिक विकास महामंडळ बार्शिटाकळी, ॲड बी. व्ही. राऊत, किरणताई कृष्णराव हिवराळे, उपदेशक महिला व बालविकास कौशल्य विकास प्रशिक्षण व्यवस्थापक बार्शिटाकळी, यांनी जागतिक महिला दिवस व महिलांवरती होणारे अत्याचार तसेच लैंगिक छळ आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी अस्तित्वात असणारे कायदे याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.
सदर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या महिला सभा / शिविर या कार्यक्रमासाठी ॲड . डी.एस पांडे, शागुक्ता खान मॅडम, से. आसिफ साहेब, डी.वाय. घुगे , हरणे साहेब, मनोहर वाघ, सहाय्यक अधीक्षक, दिवाणी न्यायालय बार्शिटाकळी, रमेशजी चव्हाण विस्तार अधिकारी (पंचायत), पांडुरंग तेलगोटे विस्तार अधिकारी (आरोग्य) पंचायत समिती येथील महिला ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत शिपाई, मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षक, ग्रामरोजगार सेवक, पत्रकार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, बचत गट तसेच गावातील इतर सर्व महिला व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड .एम. एस. थोरात व आभार प्रदर्शन ॲड .ए. एस. पांडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
निहीदा येथील गुणवंत कीसन धोटे कुटुंबीयांना आत्महत्याग्रस्त निधी प्राप्त.....
विजय ठाकरे यांचा पाठपुरावा......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील निहीदा येथील गुणवंत किसन धोटे यांनी २ ऑगष्ट्र २०२४ रोजी आत्महत्या केली होती, गुणवंत धोटे यांचे कुटुंबाला आ. हरीश पिंपळे यांनी निहीदा येथे येऊन सांत्वनपर भेट दिली असता, आमदार महोदयाने ३० हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन धोटे कुटुंबांना एक आधार दिला होता, तसेच आमदार महोदयांकडे गुणवंत धोटे यांचे प्रकरण शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून त्यांना शासनाकडून मदत मिळवुन देण्यात यावी, असा आग्रह भाजपाचे कार्यकर्ते विजय पाटील ठाकरे यांनी आमदार महोदयाकडे धरला होता, यावेळी आ. हरीश पिंपळे ांनी अशा शेतकऱ्यांना १००% मदत मिळेल, अशी ग्वाही देऊन तेथुनच तहसीलदार यांना फोन करून त्यांनी सर्व सविस्तर माहिती दिली होती, गुणवंत धोटेचे शेतकरी आत्महत्तेचे प्रकरण तयार करण्यास सांगितले, व त्याची फलसृती म्हणून १२ मार्च २०२५ रोजी मदतीचा प्राथमीक हप्ता म्हणून तलाठी गायगोळ, पोलीस पाटील सौ. सरीता विजय ठाकरे यांच्या उपस्थितीत कीसन
धोटे यांना रुपये ३०,०००/-(तिस हजार) चा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
व मदतीचा दुसरा टप्पा म्हणुन रुपये ७०,०००/- (सत्तर हजार) प्रोसेस पुर्ण झाल्यानंतर गुणवंत धोटे यांचा मुलगा चेतन व कीसन धोटे यांचे संयुक्त नावाने येत्या दोन दिवसांत फीक्स डीपॉजीट करण्यात येतील. अशी
माहिती सूत्रांनी दिली आहे,
तसेच आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी पिंपळे कुटुंबाकडुन वैयक्तिक त्यांचे मुलाला १५ हजार व मुलीला १५ हजार अशी एकुण ३० हजार रुपयांची मदत सुद्धा दीली आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी गावचे पोलीस पाटील त्याचा भाजपाचे कार्यकर्ते विजय पाटील ठाकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सदर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळाली आहे, यामध्ये आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी सुद्धा लक्ष घातले होते, त्यामुळे या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळाली आहे, बार्शिटाकळी तालुक्यामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंजर येथे होळी उत्सव साजरा.....
बार्शिटाकळी : गुरुवारी रात्री तालुक्यातील पिंजर येथे ज्ञानप्रकाश विद्यालयाजवळ महिलांनी आणि काही युवकांनी सहभाग नोंदवून होळी उत्सव साजरा केला, सर्वप्रथम महिलांनी आणि युवकांनी होळीची पूजा अर्चा करून सर्वत्र दीप प्रज्वलित केले होते, यावेळी शुभम साखरे, यश गावंडे, रोशन मुर्तळकर, गुड्डू राखुंडे, ओम गोरवे, सार्थक देशमुख, बंटी जोहारले, साहिल खंडारे, सार्थक काटे, श्री जोहारले, यश चंदेल, विनय चंदेल, आर्चीर बोंद्रे, दादू गायकवाड, रुद्र भोगे, गणेश बुटे आधी नव युवक मंडळी यामध्ये सहभागी होती, उपस्थित सर्व युवकांनी आनंद उत्सव साजरा केला, होळी हा हिंदू धर्मातील एक लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे, हा सण रंगाचा प्रेमाचा आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जातो, होळीच्या दिवशी आपण आपसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगाचा हा सण आपण साजरा करीत असतो.
Comments
Post a Comment