बार्शिटाकळीतील ९८ हजार ९९३ शिधापत्रिकांचे ई-केवायसी....... . ई-केवायसी करण्याची ३१ मार्च ही शेवटची संधी.....
बार्शिटाकळीतील ९८ हजार ९९३ शिधापत्रिकांचे ई-केवायसी....
ई-केवायसी करण्याची ३१ मार्च ही शेवटची संधी
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील ९८ हजार ९९३ शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी करून आपले हक्काचे स्वस्त धान्य मिळविण्याचा मार्ग सुकर केला. मात्र, अजूनही तालुक्यातील ४२ हजार ८८६ लाभाथ्यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांना सरकारी स्वस्त धान्य नकोय का? असा प्रश्न अन्न व नागरी पुरवठा विभागाला पडला आहे.
२८ फेब्रुवारी २०२५ ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने रेशन कार्ड धारकांना आणखी ३१ मार्च पर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली. तरीही लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याची इच्छा दिसत नाही. येत्या १४ दिवसांमध्ये ई-केवायसी न केल्यास या लाभार्थ्यांना सरकारी धान्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे. अंत्योदय योजनेचे ७२३५कार्डधारक असून, त्यांची सदस्यसंख्या २४,९६८ आहे.
तसेच प्राधान्य गटातील ३०३२३ शिधापत्रिका धारक कुटुंबे असून, १ लाख १६ हजार ९११सदस्य आहेत. अंत्योदय व प्राधान्य गट मिळून ९८ हजार ९९३ एवढी संख्या आहे. सर्वांचेच ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. यातील ९८ हजार ९९३ एवढ्या सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले. तर अजूनही ४२ हजार ८८६ सदस्यांचे बाकी आहे.
जिल्हा पुरवठा विभागानेही ई-केवायसी करण्याबाबत आवाहन केले आहे. या योजनेतून बाद होण्यापासून वाचण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करवून घ्यावी.
- आनंद गुप्ता, तालुका पुरवठा अधिकारी,
🌀निर्धारित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांना दिली जातात. प्रत्येक प्राधान्य कुटुंबास प्रति सदस्य प्रति महिना ५ किलोग्रॅम अन्नधान्य मिळण्यास पात्र आहे. अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका गरिबांपैकी गरीब कुटुंबांना दिली जातात.
- राजेश वझीरे, तहसीलदार, बार्शिटाकळी
Comments
Post a Comment