बार्शिटाकळी, पिंजर पोलिस स्टेशनचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न....
बार्शिटाकळी, पिंजर पोलिस स्टेशनचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळीः मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी बार्शिटाकळी व पिंजर पोलिस स्टेशनचे एक दिवसीय प्रशिक्षण घेतले. २४ मार्चला गुलाम नबी आझाद महाविद्यालयाच्या प्रांगणात पोलिस कर्मचाऱ्यांना रमजान ईद व १४ एप्रिल या सणांमध्ये जमाव नियंत्रण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये स्प्रिंग सेल, स्टील सेतु, एलआरटीएसएलइ ३८ रबर सो, ३८ प्रास्टिक सेल, बॉम्ब डायनामाइक, ग्रेट नॉर्थ चिली सप्रे, अनुपूर अशा अनेक प्रकारच्या बॉम्बची माहिती पोलिसांना देण्यात आली, कशा प्रकारे हाताळावे तसेच दंगल कशी नियंत्रित करावी, कारवाई करावी अशी माहिती देण्यात आली. बॉम्बचं डेमो मैदानात करण्यात बार्शिटाकळीचे पीआय तुलकलवार, एपीआय दराडे, एपीआय वारे, पीएसआय सोनवणे, पीएसआय गोसावी, पीएसआय ग्यालोरे उपस्थित होते. या सगळ्या बॉम्बची माहिती देण्याकरिता अकोला पोलिस मुख्यालयाचे एएसआय प्रेमकुमार पवार व डी. आय कुंदन कुमार इंगळे हे उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसीय पोलीस प्रशिक्षण यशस्वी करण्यात आले. प्रशिक्षण संपत्त्यानंत बार्शिटाकळी येथे पिंजर पोलीस स्टेशन व बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी ईद व १० एप्रिल हे सण व पुढील सण पाहता बार्शिटाकळी शहरात व पिंजर येथे रूट मार्च काढण्यात आला.
Comments
Post a Comment