कुणाल कामरा यांना तत्काळ अटक करा....
कुणाल कामरा यांना तत्काळ अटक करा....
बार्शिटाकळी ( तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे )
बार्शिटाकळी : तालुकाप्रमुख सचिन पाटील गालट यांनी कुणाल कामराविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. बार्शिटाकळी पोलीस स्टेशन येथे शिवसेना शिंदे
गटाचे तालुकाप्रमुख सचिन पाटील गालट, उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील जाधव बार्शिटाकळी शहर प्रमुख संदीप आखाडे , उपशहर प्रमुख सुनील बावणे, ओम परिहार, निखिल धाइत, शुभम कुकळे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते यांनी तक्रारीवर सह्या केल्या व राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या वरती निंदनीय टिप्पणी करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी समाज भावना दुखावल्या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली अशी माहिती तालुकाप्रमुख सचिन पाटील गालट यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment