जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस रेटीना बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतून वगळा........👉केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना संघटनेच्या वतीने मागणी.....
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस रेटीना बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतून वगळा........
👉केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना संघटनेच्या वतीने मागणी.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : महाराष्ट्र शासना च्या आरोग्य सेवा विभागाने १ एप्रिल पासून फेस रेटिना बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज बायोमेट्रिक प्रणाली द्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात येईल असे स्पष्ट आदेश आरोग्य विभागाचे आयुक्त आणि राष्ट्रीय ग्रामीण अभियानचे संचालक मुंबई यांनी दिले आहे. या प्रणालीतून जिल्हा परिषद आरोग्य विभागात असलेले सर्व कर्मचाऱ्यांना या प्रणालीतून वगळण्यात यावी याबाबतचे निवेदन . महाराष्ट्र राज्य नर्सेस आरोग्य कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने केंद्रीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधव यांना अकोला येथे 30 /3/ 2025 रोजी देण्यात आले.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आरोग्य सहाय्यक,सहायिका यांना या नवीन प्रणाली मुळे अडचणीचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागात गावा गावात जाऊन आरोग्य सेवा देणे या बायोमेट्रिक प्रणाली वापर करणे फार अडचणीचे ठरणार आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बायोमेट्रिक प्रणालीतून ग्रामीण भागात फिरते काम करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांना या प्रणालीतून वगळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना राज्य अध्यक्ष अशोकराव जयसिंगपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संगीता जाधव, अमरावती आरोग्य सेविका इंद्रायणी राठोड यांनी यांनी निवेदन सादर केले आहे.
Comments
Post a Comment