शेतकरी विकास मंचचे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन....
शेतकरी विकास मंचचे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन....

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : शेतकरी विकास मंच बार्शिटाकळी यांचे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी तहसील कार्यालय बार्शिटाकळी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
निवडणूकीपुर्वी भाजपाने सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा दिली होती, परंतु तसे काही अद्याप पर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तसेच शेतकरी नैसर्गिक आपत्तीत मोडकळीस आलेला आहे, उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांचे अंगावर साचलेले कर्ज पुर्णपणे माफ होणे गरजेचे आहे यासाठी बार्शिटाकळी मधील शेतकरी विकास मंच बार्शिटाकळी व विविध सामाजिक संघटना, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, शंभुसेना सामाजिक संघटना बार्शिटाकळी, पत्रकार मंडळी बार्शिटाकळी, यांच्या प्रमुख मागण्यापैकी १) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती , २) हमीभाव कायदा, ३) शेत रस्ते, ४) वन्य प्राण्यांपासून सुरक्षा, ५) पिक विमा ६) शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा, या संपूर्ण मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्री राजेश वजीरे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले यावेळी शेतकरी विकास मंच बार्शिटाकळी चे अध्यक्ष हुसैन खान, रिजवान अहमद, गजानन अमदाबादकर कारंजा लाड, शुभम राजुरकर, विशाल बुजाडे, हंसराज शेंडे कारंजा लाड, उमेश राऊत शहराध्यक्ष शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, फय्याजउद्दीन काजी , नासीर खान, मुजिब जहागीरदार, इरशाद खान, मो. नदिमुल हक, मो. अनीस, रियाज अहमद, फरहान अहमद, सैय्यद आसीफ, मो. सादीक, नदीम खान, नसरूल्ला खॉ, सहदेवराव नंदापुरे, संजय कुरोळे, श्रावण भातखडे, व बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकरी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment